23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

इन्सुली येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई…!

- Advertisement -
- Advertisement -

४७ लाखांच्या दारुसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त.

बांदा | राकेश परब : राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारु वाहतूकी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ४६ लाख ७५ हजार २०० रुपयांच्या दारुसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हरिश्चंद्र श्रीराम जाधव (४१, रा. उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आज पहाटे इन्सुली चेकपोस्टवर करण्यात आली.
आज पहाटे गोव्यातून येणारा कंटेनर (एमएच ०४ केयु २६८८) तपासणीसाठी थांबविण्यात आला. कंटेनरच्या मागील हौद्यात मोठ्या प्रमाणात दारुसाठा होता. यात एकूण ८२९ कागदी बॉक्स होते. बाजारभावाप्रमाणे दारुची किंमत ४६ लाख ७५ हजार २०० आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला २३ लाखांचा कंटेनर असा एकूण ६९ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई निरीक्षक एस. पी. मोहिते, दुय्यम निरीक्षक पी. एस. रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान संदीप कदम, सांगलीचे दुय्यम निरीक्षक हणमंत यादव, जवान जयसिंग पावरा, प्रकाश माने यांच्या पथकाने केला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

४७ लाखांच्या दारुसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त.

बांदा | राकेश परब : राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारु वाहतूकी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ४६ लाख ७५ हजार २०० रुपयांच्या दारुसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हरिश्चंद्र श्रीराम जाधव (४१, रा. उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आज पहाटे इन्सुली चेकपोस्टवर करण्यात आली.
आज पहाटे गोव्यातून येणारा कंटेनर (एमएच ०४ केयु २६८८) तपासणीसाठी थांबविण्यात आला. कंटेनरच्या मागील हौद्यात मोठ्या प्रमाणात दारुसाठा होता. यात एकूण ८२९ कागदी बॉक्स होते. बाजारभावाप्रमाणे दारुची किंमत ४६ लाख ७५ हजार २०० आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला २३ लाखांचा कंटेनर असा एकूण ६९ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई निरीक्षक एस. पी. मोहिते, दुय्यम निरीक्षक पी. एस. रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान संदीप कदम, सांगलीचे दुय्यम निरीक्षक हणमंत यादव, जवान जयसिंग पावरा, प्रकाश माने यांच्या पथकाने केला.

error: Content is protected !!