२६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर चालणार कोकणच्या पारंपरिक दशावतार कलेचा विशेष आग्रहाखातरचा सोहळा.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मुंबई भांडुप मधील कोकणातील नागरिकांच्या विशेष आग्रहास्तव २६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सायंकाळी ७ ते १० या वेळेत साई हिल येथे दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. सार्वजनिक उत्सव समिती साई हिल भांडुप पश्चिम व कोकण दशावतार कला दर्शन आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार ही लोककला सलग २८ वर्ष जोपासत आहेत.
दशावतार कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कोकणातील नामवंत दशावतार नाट्य मंडळांना खास आमंत्रित करण्यात आलेले आहे.
या दशावतार नाट्यप्रयोगाच्या दिवशी दशावतार नाट्य कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.असे प्रसिद्ध पुरोहित भास्कर गोविंद बर्वे, विवेक सावंत, अध्यक्ष राजेश कदम, उपाध्यक्ष,सुरेश धुरी, कार्याध्यक्ष, सेक्रेटरी शैलेश बावकर ,सार्वजनिक उत्सव समिती साई हिल यांनी कळविले आहे.