25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची त्रैमासिक सभा संपन्न ; विविध मुद्द्यांवर चर्चा.

- Advertisement -
- Advertisement -

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली संपन्न.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गची त्रैमासिक सभा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या दालनात जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. अनुकंपा लाभार्थि बाबत जिल्हापरिषदेच्या वतीने पूर्ण लाभ देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र माध्यमिक विभागाच्या वतीने अनुकंपा लाभ धारकांना अजुनही सेवेत समावेश करून घेतलेले नाही असे कास्ट्राईब संघटनेच्या वतीने सांगण्यात आले त्यावर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी माध्यमिक विभागच्या अनुकंपा भरती बाबत प्रशासकीय पातळीवर काम चालू असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांना बारा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना देण्यात येणारी चटोपाध्याय वेतनश्रेणी व त्याबाबतचा फरक लवकरात लवकर मिळावा या संदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे संघटनेच्या वतीने विचारण्यात आले असता त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले . तसेच प्राथमिक शाळांच्या लाईट बिल संदर्भात वित्त विभागाकडून काही दिवसात प्रत्येक शाळेच्या खात्यावर पैसे जमा होतील असे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्तीगृह मध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा बाबत संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन चौकशी करावी व त्यांच्या सोयी सुविधेकडे लक्ष द्यावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली . विद्यार्थ्यांना मिळण्यात येणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती याबाबत प्रत्येक पंचायत समिती वरती कॅम्प आयोजित करण्यात यावे अशी कास्ट्राईब संघटनेने मागणी केली असता ते लवकरात लवकर कॅम्प लावण्यात येतील असे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. सातव्या वेतन आयोगातील दुसरा, तिसरा हप्ता मिळण्यात यावा या संदर्भात सुद्धा कास्ट्राईब संघटनेने हा विषय उपस्थित केला असता याबाबत योग्य ती ग्रँडची रक्कम उपलब्ध नसलेबाबत सांगण्यात आले .ग्रँड ची रक्कम लवकरात लवकर संबंधितांना देण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.शाळेला देण्यात येणारे ऑनलाइन व ऑफलाइन कामापैकी म्हणजेच दोन्ही पैकी कोणतेही एक काम देण्यात यावे याबाबत सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संघटनेने मागणी व्यक्त केली. यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली . PFMS या प्रणालीचे परिपूर्ण प्रशिक्षण प्रत्येक मुख्याध्यापकाला देण्यात यावे अशीही मागणी कास्ट्राईब संघटनेने केली असता याबाबत सकारात्मक चर्चा होऊन लवकरात लवकर प्रशिक्षण देण्यात येईल असे सांगण्यात आले.TAG प्रशिक्षणाविषयीचे पुस्तके प्रत्येक शिक्षकाला मिळावीत याबाबत सुद्धा कास्ट्राईब संघटनेने मागणी केली असता संबंधित डाइट विभागाकडून त्याबाबत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगण्यात आले . सदर वेळी काट्राईब् संघटनेच्या वतीने आरोग्य विभागाविषयी वादळी चर्चा झाली .सभा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालना मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . खलिपे यांच्या सोबत झाली .यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या पदाधिकार्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी समस्या मांडल्या यावेळी संघटनेने जिल्हा आरोग्य् अधिकारी हे जिल्हा आरोग्य कास्टट्राईब् कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांना आढावा सभेमध्ये अपमानीत करत असल्याचा आरोप करन्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सदर बाब अनवधानाने घडल्याचे सांगितले, परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना असे परत होणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगितली. तसेच कास्ट्राईब संघटनेच्या बैठकीचे इतिवृत्त अद्यापही न दिल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली, सदर इतिवृत्त तात्काळ देणेस मुख्यकार्यकारी यांनी सांगितले असता . सहविचार सभा संपताच तासाभरात इतिवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संघटना पदाधिकारी यांना संपर्क करून दिले . तसेंच संघटनेने आरोग्य सेवक पदोन्नती मध्ये मूळ शिफारस यादी प्रमाणे पदोन्नती न करता चुकीच्या पद्धतीने पदोन्नती झाल्याने अनुसूचित जाती मधील आरोग्य सेवकांवर अन्याय झाल्याचे सांगितले तसेंच या प्रक्रिये मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची तसेंच संघटनेची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य क्षेत्रीय कर्मचारी यांना 5 दिवसाचा आठवडा लागू करनेबाबत मागणी केली. यावेळी शासनाच्या निर्णयाप्रमाणे उचित कार्यवाही करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासित् केले. तसेंच कंत्राटी आरोग्य सेविका यांच्या जिल्ह्याअन्तर्गत् बदल्या व्हाव्यात अशी मागणी कास्ट्राईब संघटनेच्या वतीने करण्यात आली . मा. प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे , माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख , वरिष्ठ लिपिक मा. दत्ता गायकवाड , तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी, प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी या सभेला उपस्थित होते.सदरवेळी कास्ट्राईब मंत्रालयीन सचिव सुरेश तांबे , कास्ट्राईब महासंघ जिल्हाध्यक्ष संदीप कदम , महासचिव किशोर कदम , आरोग्य विभाग जिल्हाध्यक्ष संजय जाधव, जिल्हासचिव दिपक कांबळे, प्राथमिक संघटना जिल्हाध्यक्ष विकास वाडीकर, प्राथमिक संघटना जिल्हा सचिव मनोज आटक , कास्ट्राईब जिल्हापरिषद कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष राजेन्द्र कदम, कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हासंघटक संजय पेंडुरकर , अभिजित जाधव, महेन्द्र कदम ,नचिकेत पवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!