कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या भरणी गावाचे पोलिस पाटील हे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा भूमिकेतून वावरत असून ते पोलीस पाटील या पदाला ते न्याय देत नाहीत. समाजमाध्यमांमधे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री सौ स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोषारी व राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करून पदाच्या कर्तव्याला विसरले आहेत व अशा भूमिका मांडून गावात वितंडवाद निर्माण करत आहेत त्यांची चौकशी करुन त्यांना तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी कणकवली भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.
कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात कणकवली तालुका भाजपा वतीने निवेदन देण्यात आले. त्यावेळी उपस्थित भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष श्री. मिलिंद मेस्त्री, भाजपा युवा मोर्चा जिल्हा संघटक श्री संदीप मेस्त्री, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख श्री महेश सावंत, राजू हिर्लेकर, कणकवली भाजपा कार्यकारणी सदस्य श्री संदीप सावंत, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री समीर प्रभुगांवकर, श्री निखिल आचरेकर, श्री महेश मेस्त्री, श्री सचिन खेडेकर, श्री रघुनाथ चव्हाण, श्री सुधीर सावंत, श्री प्रशांत चव्हाण, श्री प्रकाश घाडी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.