23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

कणकवली तालुका ई – पीक पाहणीमध्ये पहिल्या क्रमांकावर.

- Advertisement -
- Advertisement -

जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदार आर. जे. पवार यांच्या कामाचे कौतुक.

कणकवली | ब्यूरो न्यूज : ई – पीक पाहणी करिता महसूल विभागाकडून गेले काही दिवस आढावा बैठकींचे सत्र सुरू असून दस्तूरखुद्द सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी या ई – पीक पाहणी च्या कामकाजाचा नियमित आढावा घेत आहेत. गेले दोन दिवस कणकवली तहसीलदार आर. जे. पवार हे ई – पीक पाहणीच्या आढाव्याकरिता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन आढावा घेत आहेत. प्रत्येक मंडळामध्ये भेटी देत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून तहसीलदार आर. जे. पवार यांनी आढावा भेटीचे सत्र सुरू केले आहे. या दरम्यान ते फोंडाघाट येथे असताना प्रत्यक्ष भात शेतीच्या बांधावरूनच तहसीलदार आर. जे. पवार यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना ई – पीक पाहणीच्या कामाचा कणकवली तालुक्याचा आढावा दिला. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ई – पीक पाहणीमध्ये एकूण झालेल्या कामात आजपर्यंत कणकवली तालुका हा पहिल्या स्थानी असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी ई – पीक पाहणी आढाव्यामध्ये तहसीलदार आर. जे. पवार यांचे कौतुक देखील केले.

ई. – पीक पाहणीकरिता शासन स्तरावरून सातत्याने आढावा घेतला जात असताना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यादेखील याकरिता आग्रही आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेत असताना जरी फिल्डवर शेतामध्ये असलात तरी इंटरनेट सुविधा पाहून आहात त्या ठिकाणाहून व्हिडिओ कॉन्फरन्सला जॉईन व्हा अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या व त्यानुसार कणकवलीचे तहसीलदार थेट फोंडाघाट येथे शेताच्या बांधावरूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाले. जवळपास पाऊण तास या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावरूनच तहसीलदार पवार सहभागी झाले.

१५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ई – पीक पाहणी करण्याकरिता शासनाने मुदत दिली असून, कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी जास्तीत जास्त करा असे देखील आवाहन तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदार आर. जे. पवार यांच्या कामाचे कौतुक.

कणकवली | ब्यूरो न्यूज : ई - पीक पाहणी करिता महसूल विभागाकडून गेले काही दिवस आढावा बैठकींचे सत्र सुरू असून दस्तूरखुद्द सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी या ई - पीक पाहणी च्या कामकाजाचा नियमित आढावा घेत आहेत. गेले दोन दिवस कणकवली तहसीलदार आर. जे. पवार हे ई - पीक पाहणीच्या आढाव्याकरिता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन आढावा घेत आहेत. प्रत्येक मंडळामध्ये भेटी देत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून तहसीलदार आर. जे. पवार यांनी आढावा भेटीचे सत्र सुरू केले आहे. या दरम्यान ते फोंडाघाट येथे असताना प्रत्यक्ष भात शेतीच्या बांधावरूनच तहसीलदार आर. जे. पवार यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना ई - पीक पाहणीच्या कामाचा कणकवली तालुक्याचा आढावा दिला. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ई - पीक पाहणीमध्ये एकूण झालेल्या कामात आजपर्यंत कणकवली तालुका हा पहिल्या स्थानी असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी ई - पीक पाहणी आढाव्यामध्ये तहसीलदार आर. जे. पवार यांचे कौतुक देखील केले.

ई. - पीक पाहणीकरिता शासन स्तरावरून सातत्याने आढावा घेतला जात असताना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यादेखील याकरिता आग्रही आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेत असताना जरी फिल्डवर शेतामध्ये असलात तरी इंटरनेट सुविधा पाहून आहात त्या ठिकाणाहून व्हिडिओ कॉन्फरन्सला जॉईन व्हा अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या व त्यानुसार कणकवलीचे तहसीलदार थेट फोंडाघाट येथे शेताच्या बांधावरूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाले. जवळपास पाऊण तास या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावरूनच तहसीलदार पवार सहभागी झाले.

१५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ई - पीक पाहणी करण्याकरिता शासनाने मुदत दिली असून, कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई - पीक पाहणी जास्तीत जास्त करा असे देखील आवाहन तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!