बांदा |राकेश परब :
मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या शेतकरी सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. आगामी काळात शेतकरी सभासदांना योग्य वेळी खत पुरवठा करण्यासाठी सोसायटी प्रयत्नशील राहणार असल्याचे चेअरमन संतोष परब यांनी स्पष्ट केले.
मडुरा सोसायटीची वार्षिक सभा चेअरमन संतोष परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष जगन्नाथ परब, संचालक उल्हास परब, ज्ञानेश परब, प्रकाश गावडे, यशवंत कुबल, आत्माराम गावडे, प्रकाश सातार्डेकर, चंद्रकांत परब, उत्तम जाधव, सौ. स्वप्नाली परब, सौ. सुनंदा परब, गटसचिव सुभाष राऊळ उपस्थित होते.
सभेत दहावी व बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या सभासद पाल्यांचा सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला. सभेने व्यवस्थापक मंडळाच्या कामकाजाचा अहवाल, नफा – तोटा पत्रक व ताळेबंदाला मंजुरी देण्यात आली. सोसायटीतर्फे शेतकर्यांना योग्य वेळेत खतपुरवठा होत नसल्याची तक्रार सुरेश गावडे यांनी केली. यावर चेअरमन संतोष परब यांनी आगामी काळात वेळेत खतपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, दिलीप परब, यशवंत माधव, तात्या शेर्लेकर, अण्णा नाईक यांनी चर्चेत सहभाग घेतला. मडुरा तलाठी व्ही. एस. कविटकर यांनी सभेत शेतकर्यांना ई पिक नोंदणी बाबत मार्गदर्शन केले. मडुरा, रोणापाल व निगुडे गावातील सभासद उपस्थित होते. यावेळी नकुळ परब, नारायण परब, दत्ताराम परब, आनंद परब, सुनील नाईक, लिपीक प्रकाश जाधव, सेल्समन सोमनाथ परब, कॉम्प्युटर ऑपरेटर सिया परब, कोतवाल नाना वेंगुर्लेकर आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उल्हास परब यांनी आभार मानले.