26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

ठाण्यात ठाकरे गटातील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

- Advertisement -
- Advertisement -

खासदार विनायक राऊत , आमदार भास्कर जाधव व उपनेत्या सुषमा अंधारेंचा समावेश.

मुंबई | ब्युरो न्यूज : ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर मेळाव्यामध्ये आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर वक्तव्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मालिन केली. इतरही राजकीय नेत्यांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याप्रकरणी ठाकरे गटातील खासदार शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, ठाणे महिला आघाडीच्या अनिता बिर्जे, मधुकर देशमुख, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह सात जणांविरुद्ध मंगळवारी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीमध्ये कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाचाही समावेश आहे.
या प्रकरणी शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभागाप्रमुख बाळा गवस यांनी तक्रार दिली आहे.

ठाकरे गटाचा रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये जाहीर मेळावा पार पडला. संपूर्ण गडकरी रंगायतन कार्यकर्त्यांनी हाऊसफुल्ल झाले होते. या मेळाव्यामध्ये सर्व नेत्यांनी भाषणे केली. धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनीही मेळाव्याला उपस्थित राहत भाषण केले होते.

मात्र, या भाषणादरम्यान नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने करून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याचा आरोप गवस यांनी केला आहे. गवस यांनी तक्रारीमध्ये नेमकी कोणी काय वादग्रस्त वक्तव्य केली, हे देखील नमुद केले आहे. नेत्यांची भाषणे मुख्यमंत्री यांचा अवमान करणारी असल्याचे गवस यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे त्यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे. गवस यांच्या तक्रारीनंतर मंगळवारी कलम १५३, ५००, ५०४ प्रमाणे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

रविवारी ९ ऑक्टोबरला ठाण्यात गडकरी रंगायतन येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रा जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्यांनी बंडखोर सेना नेत्यांवर हल्लाबोल केला. आमदार भास्कर जाधव, शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे, विनायक राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर शाब्दीक हल्ला केला असा आरोप करण्यात आला आहे . यावेळी भास्कर जाधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल केली, खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री राणेंची नक्लल केली, तर अंधारेंनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली असा तक्रारीमध्ये आरोप करण्यात आला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!