27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

“बुढ़्ढ़ा होगा तेरा बाप..!” ( सिनेपट, अमिताभ बच्चन वाढदिवस विशेष )

- Advertisement -
- Advertisement -

एकेकाळचा कुविख्यात गॅन्गस्टर विज्जू..!
गॅन्गगस्टरगिरी सोडून पॅरीसला स्थिरावलेला विजय ऊर्फ विज्जूला म्हणजे अमिताभ बच्चनजींना एका खास कामगिरीसाठी मुंबईत बोलावले जाते.
मुंबईत ए सी पी करण मल्होत्रा नामक एक अतीकर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी गुंडाचा व अंडरवर्ल्डचा खात्मा करायची शपथ घेऊन स्वच्छ मुंबई आपली मुंबईसारख्या मोहीमेचा धडाका लावून असतो. ए सि पी करण म्हणजे सोनू सूद हा गुंडांच्या नाठाळांच्या नाकी दम आणतोय हे अंडरवर्ल्डचा अनभिषिक्त राजा म्हणजे अलीभाई प्रकाश राज याला फार चिंतेचे असते. आधी पानी कम वाटलेला ए सी पी तर उकळत्या सकस दुधाप्रमाणे माणुसकीची रक्षा करतोय व नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनतोय हे पाहून अलीभाईला काहीतरी कडक पाऊल उचलावे लागते तेच कडक पाऊल म्हणजे गॅन्गस्टरगिरी सोडलेला परंतु अजूनही ज्याच्या बंदुकीने कोणाच्याही मस्तकी गोळीचा टिळा लागू शकतो असा विज्जू आणि विजुची खासियत म्हणजे त्याच मस्तकाला लावलेल्या टिळ्यातून तो आणखी एक गोळी आरपार घालून त्याची नेमबाजीतील मास्टरी सर्वांना दाखवत आलेला असतो.

आता ए सी पी करण मल्होत्राचा खात्मा होतो का…?
विज्जूचे काय होते..? मुंबईत पोलिसांचे राज्य येते की पुन्हा गॅन्गस्टरांचा दरारा वाढतो हे पहाणे म्हणजे पुरी जगन्नाथ दिग्दर्शित साल 2011 मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी सिनेमा ‘बुढ्ढा होगा तेरा बाप…!’

या सिनेमात वयाच्या सत्तरीत अमितजींना विविध छोटेमोठे स्टंटस, नृत्य आणि स्वॅग करताना पाहिले की त्यांचा हेवा वाटल्याशिवाय रहाणारच नाही असा सिनेमा. !
जबरदस्त संवाद व साधीच पण उत्कृष्ट प्रवाही पटकथा आणि चित्रण ही या सिनेमाची वैशिष्ट्ये.
विज्जुची एक छोटी मैत्रीण म्हणजे अमृता म्हणजे चार्मी कौर हिच्यासोबत तुफान व निखळ धमाल आणलेला विज्जू बघणे खरेच दोन पिढ्यांमधील अदृश्य भिंती लाथ मारुन पाडल्यासारखीच. .!
सोनू सूद ,सोनल चौहान ,हेमामालिनी, रविना टंडन यांचे मनभरून व आपापले अभिनय अगदी त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेला न्याय देतात.
मकरंद देशपांडेचा ‘मॅक’ आणि दाक्षिणात्य अभिनेता सुब्बाराजू याने साकारलेला ‘येडा’ छान स्मरणात रहातो.

अमितजींच्या वाढदिवशी व इतरही कधी त्यांचा एखादा सिनेमा बघावासा वाटला तर हा जरुर बघा.
नेटफ्लिक्सवर हा सिनेमा जरुर बघता येईलच.

आज अमितजींचे वय कितीही झाले तरीही वाढदिवसानिमित्त त्यांचे वय विचारणार्या प्रत्येकाला एकच उत्तर बुमरॅन्ग बनून उलटे येईल ,” बुढ़्ढ़ा होगा तेरा बाप…! और सैंकडो साल जिओ अमितजी आप..!

सुयोग पंडित

Suyog_Pandit (क्लबमास्टर)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

एकेकाळचा कुविख्यात गॅन्गस्टर विज्जू..!
गॅन्गगस्टरगिरी सोडून पॅरीसला स्थिरावलेला विजय ऊर्फ विज्जूला म्हणजे अमिताभ बच्चनजींना एका खास कामगिरीसाठी मुंबईत बोलावले जाते.
मुंबईत ए सी पी करण मल्होत्रा नामक एक अतीकर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी गुंडाचा व अंडरवर्ल्डचा खात्मा करायची शपथ घेऊन स्वच्छ मुंबई आपली मुंबईसारख्या मोहीमेचा धडाका लावून असतो. ए सि पी करण म्हणजे सोनू सूद हा गुंडांच्या नाठाळांच्या नाकी दम आणतोय हे अंडरवर्ल्डचा अनभिषिक्त राजा म्हणजे अलीभाई प्रकाश राज याला फार चिंतेचे असते. आधी पानी कम वाटलेला ए सी पी तर उकळत्या सकस दुधाप्रमाणे माणुसकीची रक्षा करतोय व नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनतोय हे पाहून अलीभाईला काहीतरी कडक पाऊल उचलावे लागते तेच कडक पाऊल म्हणजे गॅन्गस्टरगिरी सोडलेला परंतु अजूनही ज्याच्या बंदुकीने कोणाच्याही मस्तकी गोळीचा टिळा लागू शकतो असा विज्जू आणि विजुची खासियत म्हणजे त्याच मस्तकाला लावलेल्या टिळ्यातून तो आणखी एक गोळी आरपार घालून त्याची नेमबाजीतील मास्टरी सर्वांना दाखवत आलेला असतो.

आता ए सी पी करण मल्होत्राचा खात्मा होतो का…?
विज्जूचे काय होते..? मुंबईत पोलिसांचे राज्य येते की पुन्हा गॅन्गस्टरांचा दरारा वाढतो हे पहाणे म्हणजे पुरी जगन्नाथ दिग्दर्शित साल 2011 मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी सिनेमा 'बुढ्ढा होगा तेरा बाप…!'

या सिनेमात वयाच्या सत्तरीत अमितजींना विविध छोटेमोठे स्टंटस, नृत्य आणि स्वॅग करताना पाहिले की त्यांचा हेवा वाटल्याशिवाय रहाणारच नाही असा सिनेमा. !
जबरदस्त संवाद व साधीच पण उत्कृष्ट प्रवाही पटकथा आणि चित्रण ही या सिनेमाची वैशिष्ट्ये.
विज्जुची एक छोटी मैत्रीण म्हणजे अमृता म्हणजे चार्मी कौर हिच्यासोबत तुफान व निखळ धमाल आणलेला विज्जू बघणे खरेच दोन पिढ्यांमधील अदृश्य भिंती लाथ मारुन पाडल्यासारखीच. .!
सोनू सूद ,सोनल चौहान ,हेमामालिनी, रविना टंडन यांचे मनभरून व आपापले अभिनय अगदी त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेला न्याय देतात.
मकरंद देशपांडेचा 'मॅक' आणि दाक्षिणात्य अभिनेता सुब्बाराजू याने साकारलेला 'येडा' छान स्मरणात रहातो.

अमितजींच्या वाढदिवशी व इतरही कधी त्यांचा एखादा सिनेमा बघावासा वाटला तर हा जरुर बघा.
नेटफ्लिक्सवर हा सिनेमा जरुर बघता येईलच.

आज अमितजींचे वय कितीही झाले तरीही वाढदिवसानिमित्त त्यांचे वय विचारणार्या प्रत्येकाला एकच उत्तर बुमरॅन्ग बनून उलटे येईल ," बुढ़्ढ़ा होगा तेरा बाप…! और सैंकडो साल जिओ अमितजी आप..!

सुयोग पंडित

Suyog_Pandit (क्लबमास्टर)

error: Content is protected !!