राकेश परब / बांदा : कोकणातील सर्वांत मोठा सण गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळेच गणपतीच्या मुर्ती शाळेत पण मुर्तीकारांची लगबग सुरू आहे. वाफोली आईरवाडीतील मुर्तीकार संजय आईर सुद्धा मुर्ती रंगकाम पुर्ण करण्यात मग्न आहेत. एकदरींतच मुर्ती रंगकामचा शेवटचा हात फीरवत आहेत. कोकणामध्ये गणेशोत्सवामध्ये सजावट मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये सुद्धा सजावट स्पर्धा काही मंडळाकडून घेण्यात येत असतात. या स्पर्धेत गणपतीची मुर्ती आकर्षण असावी यासाठी खरी मेहनत ही मुर्तीकाराचीच असते. गेले दोन महीने वाफोली सारख्या गावात संजय आईर आपल्या सहका-यासोबत मुर्तीकाम करत आहेत. दोन फुटापर्यंत पाच,सह फुटांपर्यंत च्या मुर्ती त्यांच्या शाळेत बनवण्यात येतात. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे संजय आईर मुर्ती कामात नावाजलेले आहेत. त्यांचे मुर्ती चे रंगकाम अतिशय रेखीव असल्याने शेजारच्या गोवा राज्यातुनही त्यांच्या मुर्तींना मोठी मागणी होत आहे. गोव्यातून खास संजय आईर यांच्या मुर्ती शाळेत मुर्ती घेण्यासाठी लोक येत आहेत. शालेय जीवनातून संजय यांना मुर्ती, पेंटीग या विषयात रस निर्माण झाला. आणि आज पदवीधर असुनही दरवर्षी संजय आईर मुर्ती कामात मग्न असलेले पाहालाला मिळतात. सध्या पावसाने जोर धरल्याने गणेशभक्ताकडून नाराजी व्यक्त होत आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -