25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील “सर्वोत्तम ई पेमेंट उपक्रम एफसीबीए २०२२ ” पुरस्कार जाहीर..!

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
देशातील सहकारी बँकिंग संस्थांचे आर्थिक मूल्यमापन करून त्यांच्या वार्षिक कामगिरीच्या आधारे गुणवत्ता मानांकन ठरवणारी संस्था नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य इंग्रजी मासिक Banking Frontiers यांच्यामार्फत बँकिंग क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांचा गौरव करण्यात येतो यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वोत्तम ई पेमेंट उपक्रम (Best ePayment Initiative) विभागा साठी एफसीबीए २०२२ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.सदर पुरस्कार मध्यप्रदेश इंदोर येथे दि.१६ ऑक्टोंबर २०२२ रोजी प्रदान करण्यात येणार आहे. बँकांच्या कामकाजाचा लेखाजोखा घेऊन बँकिंग क्षेत्रामध्ये बँकांनी केलेल्या प्रगतीच्या आधारे तसेच ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली अत्याधुनिक सेवा इत्यादी बाबी विचारात घेऊन विविध कॅटेगिरी मधील पुरस्कारां साठी संबंधित बँकांची निवड करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कोअर बँकिंग सुविधा व स्वतःचे डाटा सेंटर उभारून ग्राहकांना, व्यापारी बँकांच्या बरोबरीने जिल्ह्यात बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेच्या दुर्गम भागातही असलेल्या शाखा सीबीएस संगणकिकृत केल्या आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातील ९८ शाखांबरोबरच ३८ एटीम मशीन्स,मोबाईल अँपद्वारे एन इएफटी/आय एम पीएस सेवा, पॉस मशिन, युपीआय, शाखा स्तरावर बीबीपीएस, इत्यादी आधुनिक डिलिव्हरी चॅनेल्स ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत अन्य जिल्हा बँकेच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मोबाईल ॲप ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. यू पीआय वापरणा-या ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.या सर्वांचे मूल्यमापन एफसीबीए २०२२च्या निवड समितीमध्ये होऊन बँकेला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे अशाप्रकारे राष्ट्रीय स्तरावरील संस्था तसेच बँकिंग फ्रंटायर्स यासारख्या इंग्रजी मासिकाने बँकेच्या कामकाजाची दखल घेतली आहे बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर व बँकेचे संचालक मंडळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!