वृत्तसंस्था | क्रिडा : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ शुक्रवारी पर्थमध्ये दाखल झाला आहे. भारताचा १४ सदस्यीय संघ आणि १६ सपोर्ट स्टाफ सदस्य गुरूवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले होते. बी.सी.सी.आय. ने भारतीय संघाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. पण, त्यात एकमेव महिला सदस्य असलेल्या राजलक्ष्मी अरोरा यांची संघासोबतची नेमकी भूमिका कोणती त्याबद्दल खुलासा झाला नव्हता.
भारताच्या १४ खेळाडूंसोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे, मसाजर अरुण कानडे, टीम व्हिडीओ ॲनालिस्ट हरी मोहन, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप, थ्रो डाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी, डॉक्टर चार्ल्स मिंझ, स्ट्रेंथ प्रशिक्षक सोहम देसाई आणि मानसोपचार तज्ज्ञ पॅडी अप्टन हे प्रमुख फळीत आहेत.
त्याशिवाय मुख्य सायकोथेरपिस्ट कमलेश जैन, मीडिया मॅनेजर मौलिन पारिख, थ्रोडाऊन स्पेशालिस्ट नुवान सेनेविरत्ने, सहाय्यक फिजिओ योगेश परमार हे तांत्रिक बाजू सांभाळत आहेत.
राजलक्ष्मी अरोरा या बी.सी.सी.आय.च्या डिजीटल मिडिया प्रसारणाची बाजू सांभाळतात हे आता स्पष्ट झाले आहे.
भारतीय खेळाडूंच्या मुलाखतीचे आयोजन करणे हे त्यांचे प्रमुख काम आहे. २०१९ मध्ये ती बीसीसीआयच्या सेक्स्युअर हरॅसमेंटच्या तक्रारींसाठी
नेमलेल्या समितीतही त्या होत्या.
गेली ७ वर्षे त्या बी सी सी आय सोबत काम करत आहेत. याआधी त्यांनी विविध वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी काम केले आहे. २०१२ मध्ये त्यांनी पुण्याच्या सिंबाॅयसीस इन्स्टीट्यूट ऑफ मिडिया ॲन्ड कम्युनिकेशन मधून ‘ॲक्टिविटीज ॲन्ड सोसायटी’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.