प्रतिनिधी / मसुरे: देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै. शांताराम कृष्णाजी तथा बापूसाहेब पंतवालावलकर यांच्या पुण्यतिथी निमित्त संस्था व प्रशालेच्या वतीने बापूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी मुख्याध्यापक संजय बांबूळकर, प्र. मुख्याध्यापक प्रसाद बागवे, श्रीमती एम. बी. कुंज, सौ गौरी तवटे, एन जी वीरकर, एन एल बागवे, सौ प्रियांका ठाकूर, श्री नाटेकर, झुंजार पेडणेकर, मनोहर कडू, सुरेश नार्वेकर आदी उपस्थित होते. स्मृती भवन येथे बापूंच्या तसबीरीस जिल्हा बँक शाखाधिकारी श्री तळवडेकर व माजी मुख्या. संजय बांबूळकर यांनी पुष्पहार अर्पण केला.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -