23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

भाजपा प्रणित सरपंच संघटनेनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची घेतली भेट.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | ब्युरो न्यूज : ग्रामपंचायत हद्दीतील पथदिपांची वीज देयके राज्य सरकारकडून भरण्यात यावीत.तसेच घरबांधकाम परवानगीच्या जाचक अटी रद्द करुन २०१६ पूर्वी प्रमाणेच ग्रामपंचायत स्तरावर ते अधिकार द्यावेत, या प्रमुख मागण्या भाजप प्रणित सरपंच संघटनेच्यावतीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केल्या आहेत.

यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा प्रणित सरपंच संघटना स्थापन झालेली आहे. त्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अनेक वर्षापासून सरपंचांच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्या मार्गी लावण्यात याव्यात, अशी मागणीही या संघटनेच्यावतीने शुक्रवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, दत्ता सामंत, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर भाजप प्रणित सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष दादा साईल, उपाध्यक्ष विनोद राऊळ, आफ्रोजा नावलेकर, जिल्हा सरचिटणीस महेश मांजरेकर, गुरूप्रसाद(पंढरी) वायंगणकर, दाजी राणे, खजिनदार मंगेश तळगावकर, चिटणीस संजय शिरसाट, प्रमोद गावडे, उदय नारळीकर, मनोज उगवेकर, नागेश आईर, महेश शिरवलकर, नागेश परब, सुहास राणे, समीर गावडे, उदय धुरी, अंकुश कदम, सुरेश शेटवे, देवेंद्र शेटकर आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरबांधकाम परवानगीची जाचक अट रद्द करुन २०१६ पूर्वी प्रमाणे कलम ५२ नुसार ग्रामपंचायतींना बांधकाम परवानग्या देण्याचे अधिकार प्राप्त व्हावेत. सरपंचांचा एक प्रतिनीधी जिल्हा नियोजन समितीवर स्विकृत सदस्य म्हणुन घेतला जावा. ग्रामपंचायत हद्दीतील पथदीप वीज देयके हि राज्य सरकारकडुन जिल्हापरिषदेमार्फत भरली जातात. परंतु गेल्या दोन वर्षाच्या कालावधित हि देयके भरली नसल्यामुळे ग्रामपंचायातींना नाहक त्रास भोगावा लागत आहे. त्यामुळे ही देयके लवकरात लवकर भरण्यात यावीत. त्यासाठी योग्य ती निधीची तरतुद व्हावी. आपले सेवा केंद्रातील अडचणी दुर होण्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी यामधील सरपंचांची संबंधित अधिकाऱ्यांसोबत उच्च स्तरीय बैठक आयोजित करावी.अशा मागण्यांचा समावेश आहे.
फोटो ओळ – सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन भाजप प्रणीत सरपंच संघटनेच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | ब्युरो न्यूज : ग्रामपंचायत हद्दीतील पथदिपांची वीज देयके राज्य सरकारकडून भरण्यात यावीत.तसेच घरबांधकाम परवानगीच्या जाचक अटी रद्द करुन २०१६ पूर्वी प्रमाणेच ग्रामपंचायत स्तरावर ते अधिकार द्यावेत, या प्रमुख मागण्या भाजप प्रणित सरपंच संघटनेच्यावतीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केल्या आहेत.

यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा प्रणित सरपंच संघटना स्थापन झालेली आहे. त्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अनेक वर्षापासून सरपंचांच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्या मार्गी लावण्यात याव्यात, अशी मागणीही या संघटनेच्यावतीने शुक्रवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, दत्ता सामंत, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर भाजप प्रणित सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष दादा साईल, उपाध्यक्ष विनोद राऊळ, आफ्रोजा नावलेकर, जिल्हा सरचिटणीस महेश मांजरेकर, गुरूप्रसाद(पंढरी) वायंगणकर, दाजी राणे, खजिनदार मंगेश तळगावकर, चिटणीस संजय शिरसाट, प्रमोद गावडे, उदय नारळीकर, मनोज उगवेकर, नागेश आईर, महेश शिरवलकर, नागेश परब, सुहास राणे, समीर गावडे, उदय धुरी, अंकुश कदम, सुरेश शेटवे, देवेंद्र शेटकर आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरबांधकाम परवानगीची जाचक अट रद्द करुन २०१६ पूर्वी प्रमाणे कलम ५२ नुसार ग्रामपंचायतींना बांधकाम परवानग्या देण्याचे अधिकार प्राप्त व्हावेत. सरपंचांचा एक प्रतिनीधी जिल्हा नियोजन समितीवर स्विकृत सदस्य म्हणुन घेतला जावा. ग्रामपंचायत हद्दीतील पथदीप वीज देयके हि राज्य सरकारकडुन जिल्हापरिषदेमार्फत भरली जातात. परंतु गेल्या दोन वर्षाच्या कालावधित हि देयके भरली नसल्यामुळे ग्रामपंचायातींना नाहक त्रास भोगावा लागत आहे. त्यामुळे ही देयके लवकरात लवकर भरण्यात यावीत. त्यासाठी योग्य ती निधीची तरतुद व्हावी. आपले सेवा केंद्रातील अडचणी दुर होण्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी यामधील सरपंचांची संबंधित अधिकाऱ्यांसोबत उच्च स्तरीय बैठक आयोजित करावी.अशा मागण्यांचा समावेश आहे.
फोटो ओळ - सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन भाजप प्रणीत सरपंच संघटनेच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

error: Content is protected !!