25.3 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

कोकण महामार्ग जनआंदोलन मानवी साखळीचे ८ सप्टेंबर रोजी आयोजन!

- Advertisement -
- Advertisement -

प्रतिनिधी / मसुरे : समृध्द कोकण संघटना आणि कोकण हायवे समन्वय समिती नियोजित स्वराज्य भूमी कोकण महामार्ग जन आंदोलन आणि श्रद्धांजली मानवी साखळी दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत नांदगाव तिठा ते ओटव फाटा येथे आयोजित केलेली आहे. तरी या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्थानिक रहिवासी आणि गणेश उत्सवासाठी इतर शहरातून आलेल्या सर्व चाकरमानी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामार्ग निर्मितीच्या कामात झालेला विलंब,नियोजनातील त्रुटी,कामाचा निकृष्ट दर्जा यांच्या विरोधात आपला निषेध नोंदवावा आणि हे आंदोलन यशस्वी करावे अशी विनंती समृध्द कोकण संघटनेचे संचालक डॉ.दीपक परब आणि या आंदोलनाचे संयोजक श्री.सुरेश मोरये यांनी केले आहे.
कोकण हायवे समन्वय समितीच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत, पळस्पे फाटा पनवेल ते झाराप पर्यंत खड्डेमुक्त आणि दर्जेदार कोकण हायवे पुढील गणेश चतुर्थी पर्यंत पूर्ण करावा.
संपूर्ण महामार्ग पूर्ण होऊन व्यवस्थित पद्धतीने चालू होत नाही तो पर्यंत कोणत्याही टोल नाक्यावर टोल आकारू नये.
महामार्ग निर्मितीच्या कामात झालेला विलंब, स्थानिक नागरिकांनी गमावलेले प्राण आणि त्यांनी गेल्या ११ वर्षात सहन केलेला त्रास यांच्या मोबदल्यात MH ०६,०७ आणि ०८ ह्या पासींग च्या गाड्यांकडून टोल आकारला जावू नये.
शाळा,महाविद्यालय,औद्योगिक केंद्र,उपचार केंद्र यांच्या ठिकाणी लोकांना महामार्ग ओलांडण्यासाठी योग्य असे अँडरपास, सर्विस रोड आणि पादचारी पथ असावे. सर्विस रोड दोन्हीही दिशेने चार चाकी वाहने सुरक्षितपणे चालवता येतील इतक्या रुंदीचे असावेत.
महामार्गाच्या दोन्हीही बाजूला प्रवास करताना प्रवाशांसाठी आवश्यक अश्या नागरी सुख सुविधांची निर्मिती करावी.
पावसाळ्यामध्ये रस्त्यावरील तसेच शेजारील गाव आणि शेतीमधील पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक अशी सुनियोजित व्यवस्था असावी.
महामार्गाच्या दोन्हीही बाजूला त्या त्या परिसरातील झाडांची लागवड करून चांगल्या प्रतीचा ग्रीन कॉरिडॉर निर्माण करावा जेणेकरून महामार्ग निर्मितीच्या कामामुळे झालेल्या नैसर्गिक नुकसानीचे पुनर्वसन करता येईल.
मुंबई गोवा महामार्गास स्वराज्य भूमी कोकण महामार्ग असे नाव देण्यात यावे आणि स्वराज्याचे शिलेदारांच्या नावाने ठीक ठिकाणी त्यांच्या स्मुर्ती प्रीत्यर्थ चौक तयार करून तिथे प्रेरणादायी स्मारक बांधावे. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थानि सहभागी होण्याचे आवाहन डॉ दीपक परब, सुरेश मोरये यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!