सरपंच सौ.स्वाती सतिश वाईरकर यांचा उपक्रम..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे सरपंच स्वाती सतीश वाईरकर, माजी सरपंच सतीश वाईरकर यांच्या सौजन्याने गावातील सुमारे दीडशे शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन वैभव वेळे (कोयते) वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच स्वाती सतीश वाईरकर, उपसरपंच शैलेंद्र शंकरदास,
जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती श्री संतोष साटविलकर, ग्रामपंचायत सदस्य प्राची म्हाडगुत, तंटामुक्ती अध्यक्ष श्री सुनील गुराम, ग्रामपंचायत सदस्य मकरंद सावंत, ग्रामसेवक श्री लक्ष्मण सरमळकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत भोजणे, सोनाली भोजणे, संकेत परुळेकर, विजय गोठणकर आणि गावातील ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. संतोष साठविलकर यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.