बांदा | राकेश परब :
ललिता पंचमीचा योग साधून रोटरी क्लब ऑफ बांदा, रोटरी क्लब ऑफ माहीम(मुंबई)आणि मैत्रेयी महिला मंडळ ट्रस्ट माहीम मुंबई यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद केंद्रशाळेतील मुलांचे श्रवण चिकित्सा,उपचार व समुपदेशनशिबिर पार पडले. या शिबिरामध्ये सुमारे ५० विद्यार्थी व शिक्षक यांच्या कानाची तपासणी करण्यात आली. रो.डॉ.लतिका बांदेकर (गुरमीत बछेर) यांनी ही तपासणी केली. पुढील काळात बांदा शाळेतील सर्व मुलांच्या कानाची तपासणी केली जाईल असे रोटरी क्लब ऑफ बांदाचे प्रेसिडेंट मंदार कल्याणकर यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे बांदा दशक्रोशीतील गरजू मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रमही घेण्यात आला. डोंगरपाल, कळणे असनिये व इन्सुली या गावातील लांबून शाळेत येणाऱ्या सुमारे सात मुलींना सायकल वाटप करण्यात आले. या सायकली रोटरी क्लब ऑफ माहीमने रोटरी क्लब बांदाच्या सहकार्याने गरजू मुलींना प्रदान केल्या. याचवेळी डेगवे येथील गरजू महिला सौ.सुहासिनी दताराम देसाई यांना घरघंटी वाटप रोटरी क्लब ऑफ माहीम च्या वतीने करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ माहीमने यापूर्वी ही केंद्र शाळा बांदा नंबर एक ला दोन वर्ग खोल्यांमध्ये अतिशय सुंदर असे फॉल्स सिलिंग चे कामही करून दिले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो.शिवानंद भिडे यांनी केले.
प्रास्ताविकामध्ये रोटरी क्लब ऑफ बांदाने क्लब स्थापन झाल्यापासून घेतल्या गेलेल्या उपक्रमांची माहिती दिली. रो.मंदार कल्याणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुढील काळात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. समाजात अनेक उपेक्षित माणसं असतात त्या माणसांपर्यंत पोहोचण्याचे काम रोटरी क्लब करेल असे त्यांनी यावेळी सांगितले. चष्मेवाटप आणि डोळ्यांचे तपासणीचे शिबिरही घेतल्याची त्यांनी माहिती दिली. यावेळी रोटरी क्लब ऑफ माहीमच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते मांडली. त्याचप्रमाणे ए जी रो.नीता गोवेकर यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षा रो.डॉक्टर लतिका बांदेकर यांनीही आपले मनोगत मांडले. त्यांनी बांदा रोटरी क्लबचे कौतुक करत असताना आपले सहकार्य यापुढेही बांदा रोटरी क्लबला राहील असे सांगितले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ माहीम चे सुमारे 15 रोटरियन्स पदाधिकारी हजर होते. बांदा केंद्र शाळेतील शिक्षिका सावंतमोरये मॅडम व जे.डी.पाटील सर यांनीही आपली मनोगते मांडून धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार बांदा रोटरी क्लबचे सेक्रेटरी फिरोज खान यांनी मानले या कार्यक्रमात बांदा क्लबचे सर्व सदस्य हजर होते त्यामध्ये उपाध्यक्ष रो.प्रमोद कामत, खजिनदार रो. बाबा काणेकर,
रो.घनश्याम पावसकर, रो.दिगंबर गायतोंडे,रो.रत्नाकर आगलावे,रो.स्वागत नाटेकर रो.मनसुख वासानी,रो.स्वप्निल धामापुरकर, रो.सचिन मुळीक, रो.आपा चिंदरकर, रो.आबा धारगळकर, रो.सुनील राऊळ,
रो.प्रवीण शिरसाट, रो.हनुमंत शिरोडकर, रो.योगेश परुळेकर रो.डॉ.जगदीश पाटील, रो.डॉ. प्रसाद कोकाटे, रो.सुधीर शिरसाठ, रो.विशाल मळेवाडकर, रो.सुदन केसरकर, रो.शितल राऊळ, रो.संतोष सावंत, रो.दिलीप कोरगावकर, रो.गावडे, रो.तुषार धामपूरकर,रो.डॉ.नारायण नाईक, रो.डॉ. संजय सावल आदी उपस्थित होते.