मालवण | सुयोग पंडित : सध्या चिनी वस्तूंवरील बहिष्कारा विषयी जागरण होत आहे. यात मुंबईतील कलीना क्षेत्रातील भा. ज. यु. मो. अध्यक्ष संदीप गुप्ता यांनी एक वेगळा पर्याय सुचवला आहे.
जिल्हाधिकार्यांच्या अखत्यारीतील सर्व जागांवर छोटी गोदामे तथा गाळे बनवून ते छोट्या छोट्या उद्योगांसाठी तथा कारखान्यांसाठी द्यावेत.
त्यांना अधिकृत परवाने देण्यात यावेत. यामुळे कागदपत्रांचा अतिरिक्त ताण पडणार नाही, बॅंकांकडून ओव्हर ड्राफ्टची सुविधाही सुलभ होईल, राज्याचा महसूल देखील शिस्तबद्धपणे वाढत जाईल व यावर काटेकोर सरकारी अंकुश देखील असेल .
छोट्या कारखाना उद्योगांना चालना मिळाली की चायना मालाला सक्षम पर्याय व नवी स्वदेशी बाजारपेठ मिळेल असा विश्वास भाजयुमोचे कलीना विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष संदीप गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.