24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

देवगड येथील सुजल ॲग्रो केअर मार्ट आयोजित शेतकरी संवाद मेळावा संपन्न..!

- Advertisement -
- Advertisement -

हवामान तज्ञ पंजाबराव डंख यांचे विशेष मार्गदर्शन..!

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
जागतिक उष्णतेमध्ये वाढ झाल्याने गेले काहि वर्षे अतिवृष्टी व वादळे निर्माण झाली आहेत. पर्यावरणामध्ये समतोलपणा राखण्यासाठी व नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झाडे लावणे महत्वाचे आहे. यावर्षी 28 ऑक्टोंबर पासून थंडीची सुरुवात होणार असल्याचे मत हवामान तज्ञ पंजाबराव डंख यांनी देवगड येथील सुजल ॲग्रो आयोजित शेतकरी संवाद मेळाव्याच्या वेळी व्यक्त केले.
सुजल ॲग्रो केअर मार्ट, देवगड यांच्यावतीने आंबा बागायतदारांना अचूक तसेच परिमाण कारक हवामान अंदाज कळण्याकरिता राज्यातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डंख यांचा इंद्रप्रस्थ सभागृह देवगड, येथे शेतकरी संवाद व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे, पंचायत समिती कृषी अधिकारी दिगंबर खराडे,किशोर गोसावी,सुजल ॲग्रोचे लक्ष्मण वाडेकर,जयवंत गोसावी,सुरज कदम तसेच देवगड तालुक्यातील आंबा बागायतदार व शेतकरी वर्ग बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना हवामान तज्ञ पंजाबराव डंख म्हणाले की, कोरोनाच्या काळामध्ये शेती व्यवसायानेच देशाला तारले आहे. यामुळे शेतकरी हा प्रसंगामध्येही देशाचा पोशिंदा असल्याचे सिध्द करुन दाखविले आहे. पुर्वेकडून पावसाला सुरुवात झाली असता त्यावर्षीचा पाऊस चांगल्या प्रकारे पडला जातो. असे अनेकवेळा सिध्द झाले आहे.
अवकाळी पाऊस का पडतो
कोलंबो म्हणजेच श्रीलंकेमध्ये चक्रीवादळ निर्माण झाले तर महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम होउुन अवकाळी पाऊस पडत असतो. श्रीलंकेमध्ये चक्रीवादळाचे केंद्र बिंदु राहिल्यास त्या त्या वेळी कोकण किनारपटटीवरती अवकाळी पाऊस पडल्याचे सिध्द झाले आहे. बदलत्या हवामानामध्ये पिके घेणे हि एक कसोटिच निर्माण झाली तरी शेतक-यांनी पाऊस केव्हा पडु शकतो चक्रीवादळे केव्हा निर्माण होऊ शकतात हे निसर्गामधूनच म्हणजेच झाडे व निसर्गाच्या हालचालीवरुन दिसून येत असतात. मात्र याचा अभ्यास करणे महत्वाचे असते.
2 मे ते 10 मे ला सोसाटयाचे वारे वाहत असतील तर त्या त्या वर्षी लवकर पाऊस येण्याचा ईशारा असतो. कोकणामध्ये 10 ते 11 ऑक्टोंबरला मुसळधार पाऊस पडणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. गारपीठ हि सर्व साधारणपणे दरवर्षी 22 फेब्रवारी ते 10 मार्च लाच होत असते. काळया जमिनीवरती कधीही गारपीठ पडत नसते. गारपीठ हे नदी नाल्याच्या एक किलो मिटर आजु बाजुलाच मोठया प्रमाणात होत असते. महाराष्ट्रामध्ये रायवळ आंब्याचे पिक जास्त प्रमाणात आले की, त्यावर्षी पावसाचा दुष्काळ निर्माण होतो. ज्यावर्षी रायवळ आंब्याचे उत्पादन कमी त्यावर्षी पाऊसही मोठया प्रमाणात पडत असतो. असे हवामानाबददल त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी वर्गाला आंबापिक विमा कोणत्या वर्षी काढावा त्यावर्षी अवकाळी पाऊस पडणार त्याच वर्षी आंबा पिक विमा काढला पाहिजे याचा फायदा शेतकरी वर्गाला होणार असल्याचे शेतकरी वर्गामध्ये चर्चा रंगली होती. देवगड मधील शेतक-यांना व्हॉटसप ग्रृप तयार करुन त्या त्या शेतक-यांना पाऊस कधी पडणार चक्रीवादळे केव्हा येणार असा हवामानाचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डंख देणार आहेत. यामुळे आंबा बागायतदारांना देखील अवकाळी पाऊस पडल्याची पुर्व सुचना मिळाल्यास पाऊस पडण्याअगोदरची फवारणी व पाऊस पडल्यानंतर कोणती फवारणी करावा याचा अंदाज मिळून शेतक-यांना अर्लटदेखील राहता येणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!