25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

“बुलाती है, मगर जाने का नही……!”

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : “एखाद्या असहाय्य स्त्रीचा, मुलीचा कळकळीने फोन किंवा सेलफोनवर संदेश येतो आणि ती व्हिडिओ काॅल करायला भाग पाडते आणि प्रत्यक्षात तो एखादी पाॅर्न साईट किंवा ब्लॅकमेलिंगचा एखादा अश्लील खेळ ठरतो..” अशी उदाहरणे सध्या वाढत आहेत. महिलेच्या आवाजामागे प्रत्यक्षात एखादा भुरटा पुरुषही असतो अशी मनःस्ताप देणारी सॉफ्टवेअर्स निर्माण होत आहेत.
या सर्व ऑनलाईन फसवणुकीचा पौगंडावस्थेतील युवा पिढी आणि अगदी निवृत्त ज्येष्ठ नागरीकांनाही फटका बसत आहे.
याबद्दल नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा पोलिस ठाण्यातर्फे एक जागृती आवाहन करण्यात आले आहे.

आचरा पोलीस स्टेशन तर्फे नागरीकांना आवाहन करताना म्हणले आहे की सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणूकीबाबत नवनवीन फंडे वापरले जात असून यात जास्त करून तरुण पिढी फसली जात असल्याचे दिसून येत आहे. आचरा भागात असे प्रकार वाढले असून अनोळखी नंबर,फोन कॉल पासून सावध रहावे.
आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी आवाहन करताना सांगितले की सायबर गु्हेगारांकडून ऑनलाईन आर्थिक फसवणूकीसाठी नवनवीन क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. यात फोन करुन एखाद्या असहाय्य स्त्री चा आव आणून आर्थिक मदत पाहिजे म्हणून सांगून व्हिडिओ कॉल करण्यास सागून फसविणे, सहज सुलभ ऑनलाईन कर्ज तात्काळ मंजूर करुन देण्याच्या लोन अपचा फंडा वापरुन गंडा घालणे, वीजबिल थकित असल्याचा बहाणा करुन फसवणे, फेसबूक, इन्स्टाग्रामवर अज्ञात महिलेकडून येणारी फ्रेंड रिक्वेस्ट, नोकरीचा बहाणा आदी बहाण्याने फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. याबाबत प्रत्येकाने सावधगिरी बाळगत अनोळखी नंबर वरुन येणारे फोन कॉल उचलू नयेत, तसेच आपला युपीआय पीनकोड कोणालाही देऊ नये, प्रत्यक्ष वा सुरक्षित आर्थिक व्यवहारावर भर द्या, व्हॉट्सअप वा इमेलवरुन आलेली कोणतीही लिंक ओपन करू नये यातून आपली फसवणूक होवू शकते या दृष्टीने सर्वांनी सावधगिरी बाळगावी.

थोडक्यात कुठल्याही ऑनलाईन मोहाची संधी जरी आली तरी सर्वांनी सावधपणे सतर्क राहून त्या संधीबद्दल सावध राहून इतकेच लक्षात ठेवावे की ” वो बुलाती है…मगर जाने का नही…!”

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : "एखाद्या असहाय्य स्त्रीचा, मुलीचा कळकळीने फोन किंवा सेलफोनवर संदेश येतो आणि ती व्हिडिओ काॅल करायला भाग पाडते आणि प्रत्यक्षात तो एखादी पाॅर्न साईट किंवा ब्लॅकमेलिंगचा एखादा अश्लील खेळ ठरतो.." अशी उदाहरणे सध्या वाढत आहेत. महिलेच्या आवाजामागे प्रत्यक्षात एखादा भुरटा पुरुषही असतो अशी मनःस्ताप देणारी सॉफ्टवेअर्स निर्माण होत आहेत.
या सर्व ऑनलाईन फसवणुकीचा पौगंडावस्थेतील युवा पिढी आणि अगदी निवृत्त ज्येष्ठ नागरीकांनाही फटका बसत आहे.
याबद्दल नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा पोलिस ठाण्यातर्फे एक जागृती आवाहन करण्यात आले आहे.

आचरा पोलीस स्टेशन तर्फे नागरीकांना आवाहन करताना म्हणले आहे की सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणूकीबाबत नवनवीन फंडे वापरले जात असून यात जास्त करून तरुण पिढी फसली जात असल्याचे दिसून येत आहे. आचरा भागात असे प्रकार वाढले असून अनोळखी नंबर,फोन कॉल पासून सावध रहावे.
आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी आवाहन करताना सांगितले की सायबर गु्हेगारांकडून ऑनलाईन आर्थिक फसवणूकीसाठी नवनवीन क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. यात फोन करुन एखाद्या असहाय्य स्त्री चा आव आणून आर्थिक मदत पाहिजे म्हणून सांगून व्हिडिओ कॉल करण्यास सागून फसविणे, सहज सुलभ ऑनलाईन कर्ज तात्काळ मंजूर करुन देण्याच्या लोन अपचा फंडा वापरुन गंडा घालणे, वीजबिल थकित असल्याचा बहाणा करुन फसवणे, फेसबूक, इन्स्टाग्रामवर अज्ञात महिलेकडून येणारी फ्रेंड रिक्वेस्ट, नोकरीचा बहाणा आदी बहाण्याने फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. याबाबत प्रत्येकाने सावधगिरी बाळगत अनोळखी नंबर वरुन येणारे फोन कॉल उचलू नयेत, तसेच आपला युपीआय पीनकोड कोणालाही देऊ नये, प्रत्यक्ष वा सुरक्षित आर्थिक व्यवहारावर भर द्या, व्हॉट्सअप वा इमेलवरुन आलेली कोणतीही लिंक ओपन करू नये यातून आपली फसवणूक होवू शकते या दृष्टीने सर्वांनी सावधगिरी बाळगावी.

थोडक्यात कुठल्याही ऑनलाईन मोहाची संधी जरी आली तरी सर्वांनी सावधपणे सतर्क राहून त्या संधीबद्दल सावध राहून इतकेच लक्षात ठेवावे की " वो बुलाती है…मगर जाने का नही…!"

error: Content is protected !!