विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथील रामेश्वर वाचनालयाची वार्षिक सभा संपन्न झाली. यावेळी बोलताना , स्पर्धा परीक्षेत यशस्वीतेसाठी अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची आवड प्रत्येक विद्यार्थ्याने जोपासने आवश्यक असल्याचे मत रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी यांनी व्यक्त केले.
रामेश्वर वाचनालयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी यांच्यिच अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी त्यांच्या सोबत संस्थेचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर,सौ उर्मिला सांबारी, अशोक कांबळी,सौ दिपाली कावले, सुभाष सांबारी, चंद्रकांत घाडी, पुष्पलता आचरेकर चॅरिटेबल ट्रस्टचे मारुती आचरेकर, ग्रंथपाल विनिता कांबळी,सौ उज्वला सरजोशी, अभिजित जोशी, दिगंबर मुंबरकर यांसह अन्य वाचक विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी यावर्षीचा कै सौ.पुष्पलता प्रभाकर आचरेकर फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट आचरे पुरस्कृत नियमित वाचक चोखंदळ वाचक पुरस्कार मालवण येथील प्रफुल्ल गवंडे यांना संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी, उपाध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.यावेळी बोलताना गवंडे यांनी संध्या मुले वाचना पासून दूर जात असून वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मुलांना शाळेत प्रवेश देताना विद्यार्थी वाचनालयाचा सभासद असल्याची अट आवश्यक करण्याची मागणी शिक्षण मंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले.यावेळी वाचनालयातर्फे दहावी बारावी व स्काॅलरशिप मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणारया विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला.आभार बाबाजी भिसळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे सहग्रंथपाल महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण, सांस्कृतिक समितीच्या भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे यांनी विशेष परिश्रम घेतले.