मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
फ्लोरेट कॉलेज कणकवली येथे फॅशन ॲक्सेसरीज प्रदर्शन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती कंझ्युमर सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे आणि महाजन उपस्थित होते. अक्सेसरीज मधील मुलांनी नेकलेस, ब्रेसलेट, इयर रिंग, फिंगर रिंग, हे वेगवेगळे धागे कापडाच्या सहाय्याने बनवले. सिल्क एम्ब्रोईडरी दोरे, फॅब्रिक, पेपर, शंख शिंपले यांचा मुख्य वापर केला होता.
उषा करलकर व सुवर्णा करमळकर हिने धातू वापरून तर तृप्ती हिने शंख शिंपले वापरून अक्सेसरीज बनविल्या. केतकी काकतकर ,योगिता घाडीगावकर, आणि मिताली शिंदे हिने पेपर वापरून फॅशन ॲक्सेसरीज बनवल्या. ललना पाटणकर, संजना सावंत ,किरण मोस्त्री हिने कापड वापरून तर साक्षी चोडणकर हिने सिल्क धागे वापरून फॅशन ॲक्सेसरीज बनवल्या.
गिऱ्हाईकाच्या सध्याच्या गरजा कोणत्या हा मुख्य हेतू लक्षात घेऊन कॉलेजच्या मुलांनी वेगवेगळ्या ॲक्सेसरीज बनवल्या. प्रा. सायली तळवडेकर व प्रा . स्नेहा कामत यांनी मुलींना मार्गदर्शन केले.
प्रमुख उपस्थिती संदीप नलावडे सर म्हणाले ग्राहकाची पसंती ओळखणे हे उद्योजकाचे काम असते हे ओळखलं तरच उद्योजकाची प्रगती होईल. असेच वेगवेगळे उपक्रम कॉलेजने राबवले तर मुलांमध्ये नक्कीच प्रगती होईल व नवीन उद्योजक जन्माला येतील. तसेच मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमांमध्ये कॉलेज हेड सार्था कदम , मनिषा देसाई व्यवस्थापक ,इंटेरियरच्या प्रा अक्षयी येडवे मॅडम, अमेय पालकर सर, प्रा. सायली तळवडेकर, प्रा स्नेहा कामत व विद्यार्थी उपस्थित होते. प्रदर्शन २६ सप्टेंबर रोजी सर्वांसाठी सकाळीं ९ ते दुपारी २ पर्यंत खुले राहील.