आमदार वैभव नाईक व तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या विशेष मार्गदर्शन आदेशानुसार आयोजीत बैठक .
ज्येष्ठ शिवसैनिक व माजी सरपंच श्याम घाडी यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाली बैठक.
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक येथे काल सायंकाळी शिवसेना आचरा विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीला ज्येष्ठ शिवसैनिक व माजी सरपंच श्याम घाडी यांचे मार्गदर्शन व नेतृत्व होते तर त्रिंबक उपसरपंच व शेतकरी पतसंस्था अध्यक्ष श्रीकांत बागवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी युवासेना उपतालुकाप्रमुख आशू मयेकर, आचरा विभाग संघटक व पळसंब श्री चंद्रकांत गोलतकर , आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीमध्ये विभागातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याच्या निर्णयही या बैठकीनंतर फटाके वाजवून साजरा केला गेला.
या बैठकीला आचरा उपविभाग प्रमुख अनिल गांवकर , त्रिंबक शाखाप्रमुख संतोष गोरीवले, त्रिंबक उपशाखाप्रमुख हरी साटम , दिलीप परब, संतोष घाडीगांवकर, अरविंद साटम, शेखर त्रिंबककर, अभय गावडे, निलेश गावडे, बाळकृष्ण त्रिंबककर, प्रशांत त्रिंबककर, संदीप तेली, जयवंत बागवे, दाजी भाटकर, संतोष कदम, नंदकुमार कदम, सत्यविजय राऊत, बाबा कदम, सुभाष , बाळू राणे व इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही आढावा बैठक आमदार वैभव नाईक व तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या विशेष मार्गदर्शन आदेशानुसार संपन्न झाल्याचे विभाग प्रमुख समीर लब्दे यांनी सांगितले.