तज्ञ पशुवैद्यकीय डाॅक्टर्सची उपस्थिती ; सर्व शेतकरी व पशूपालकांना जनावरांसहीत उपस्थित रहाण्याचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केले आवाहन.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : मालवण तालुक्यातील पळसंब गावठणवाडी येथे दिनांक २७ सप्टेंबरला जयंती मंदिर येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत पशु वैद्यकीय शिबिर व लंम्पी लसीकरण घेण्यात येणार आहे . तरी पळसंब गावातील सर्व शेतकरी व पशुपालक यांनी जनावरांसहित उपस्थित रहावे असे आवाहन पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे.
या शिबिरासाठी डॉ. श्री .वैर्लेकर .,डॉ . श्री . मिलिंद कांबळी , डॉ श्री .शिरसाठ ,डॉ . श्री .जोगळे मॅडम ,डॉ . के .जी . पाग्रडकर , श्री सागर तांबे उपस्थित रहाणार आहेत.