एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, मालवण कार्यालय येथे अभियानाचे उद्घाटन
राष्ट्रीय पोषण माह अभियानात मालवण तालुका आदर्शवत काम करेल ! : मान्यवरांचे कौतुकोद्गार
प्रतिनिधी / मालवण : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मालवणचे काम नेहमीच दर्जेदार राहिले आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय पोषण माह अभियानातही मालवण तालुका आदर्शवत काम करेल. असे कौतुकोद्गार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय पोषण माह १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या अभियानाचा शुभारंभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मालवणच्या मेढा येथील कार्यालयात बुधवारी करण्यात आला
यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी कौमुदी रसाळ-पराडकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर यासह मुख्य सेविका स्नेहा सामंत, स्नेहल गावडे, उल्का खोत, रत्नावली कदम, मंगल जंगले, सहायक संरक्षक अधिकारी रंजन कोळंबकर, बबन भिसे, प्रवीण वस्त, प्रवीण परब यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.
मालवणचे एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय म्हणजे जो कार्यक्रम दिला तो शंभर टक्के यशस्वी करणारे कार्यालय अशी ओळख निर्माण झाली आहे. असे कौतुक सभापती, उपसभापती यांनी केली.
अंगणवाडी सेविकांचेही कौतुक
कमी पगारात जास्त काम करणाऱ्या सेविका म्हणजे अंगणवाडी सेविका आहेत. असे असतानाही आपले काम त्या कर्तव्यनिष्ठपणे बजावत असतात. त्यांच्या मानधनात राज्य सरकारने भरीव वाढ करावी. असे मत सभापती अजिक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी व्यक्त केले.