मसुरे | प्रतिनिधी : जि.प.केंद्रशाळा मसुरे नं.१ शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी शिवराज सावंत यांना मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार प्राप्त झाला आहे.जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी करणे आणि उपस्थिती टिकविणे यासाठी प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार दिला जातो.
सदर पुरस्कार मालवण विस्तार अधिकारी उदय दीक्षित यांच्या हस्ते सौ.सावंत मँडम यांना केंद्रशाळा मसुरे नं.१ येथे सन्मानपत्र,पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन प्रदान करण्यात आला. यावेळी गुरुनाथ ताम्हणकर ,श्री.गोपाळ गावडे ,श्री.सचिन डोळस व सौ.हेमलता दुखंडे उपस्थित होते.
आपल्या या यशात केंद्रप्रमुख नारायण देशमुख,विनोद कदम ,श्री.गुरुनाथ ताम्हणकर ,श्री.गोपाळ गावडे ,श्री.विनोद सातार्डेकर ,सौ.रामेश्वरी मगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे गौरवोद्गार सत्कार प्रसंगी सौ.सावंत यांनी काढले.त्यांच्या या यशाबद्दल शा.व्य.स.अध्यक्ष श्री.सन्मेश मसुरेकर व माजी शा.व्य.समिती अध्यक्ष श्री.दत्तप्रसाद पेडणेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने यापुढेही आपली मसुरे नं.१ केंद्रशाळा सदैव प्रगतीपथावर मार्गक्रमण करेल अशी सदिच्छा सौ.सावंत मँडम यांनी व्यक्त केली.