28.2 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

पोलीसांच्या नैमित्तीक रजा वाढणार ; राज्य मंत्रिमंडळाने जाहीर केले काही महत्वाचे निर्णय.

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : महाराष्ट्र राज्य मंत्रिमडळाच्या आज झालेल्या बैठकीत, विविध खात्यांचे काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार.
पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या कामकाज 28 सप्टेंबरपासून प्रारंभ होईल असा उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी निर्णय आहे तर राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करुन शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याचा वित्त निर्णय घेतला गेला.

गृह विभागाच्या महत्वाच्या निर्णय म्हणजे पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवल्या जाणार आहेत.
सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्णय घेतला आहे.
नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा देण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आहे.
वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देणार. सुधारित खर्चास आणि राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.
बार्शी येथील लक्ष्मी सोपान ॲग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खाजगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश करण्याचा एक निर्णय पणन विभागाने घेतला आहे.
औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करण्याची घोषणा विधी व न्याय विभागाने केली असून
राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे एम पी एस सी मार्फत भरण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन समितीने घेतला आहे.
धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्याचा गृहनिर्माण विभागाने घेतला आहे.

(फोटो सौजन्य : गुगल)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!