27.3 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

कलमठ सुतारवाडीतील आचरा रस्त्याला गटार बांधणी आवश्यक ; मिलिंद मेस्त्रींची कार्यकारी अभियंता सा. बां. विभागाकडे मागणी.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | प्रतिनिधी : कलमठ सुतारवाडी येथे आचरा रस्त्याला गटार बांधून देण्यात यावे अशी मागणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री यांनी केली आहे.

कणकवली तालुक्यातील मौजे कलमठ सुतारवाडी ( कोरगांवकर दुकान नजिक) आचरा मार्ग याठिकाणी रस्त्याला गटार नसल्याने पावसाळयातील सर्व पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे तेथून ये – जा करणाऱ्या लोकांच्या अंगावर पाणी उडते. तसेच दुचाकी गाडया सदर रस्त्यावरून जाताना घसरून अपघात होत आहेत. याचा गांर्भीयाने विचार करून रस्त्यालगत कोरगांवकर दुकानापासून ते आचरा तिठापर्यंत कायमस्वरूपी काँक्रिट गटार करून रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा करावा, ही अशी मागणी मिलिंद मेस्त्री यांनी केली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | प्रतिनिधी : कलमठ सुतारवाडी येथे आचरा रस्त्याला गटार बांधून देण्यात यावे अशी मागणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री यांनी केली आहे.

कणकवली तालुक्यातील मौजे कलमठ सुतारवाडी ( कोरगांवकर दुकान नजिक) आचरा मार्ग याठिकाणी रस्त्याला गटार नसल्याने पावसाळयातील सर्व पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे तेथून ये - जा करणाऱ्या लोकांच्या अंगावर पाणी उडते. तसेच दुचाकी गाडया सदर रस्त्यावरून जाताना घसरून अपघात होत आहेत. याचा गांर्भीयाने विचार करून रस्त्यालगत कोरगांवकर दुकानापासून ते आचरा तिठापर्यंत कायमस्वरूपी काँक्रिट गटार करून रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा करावा, ही अशी मागणी मिलिंद मेस्त्री यांनी केली आहे.

error: Content is protected !!