मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सध्या बहुचर्चित ‘चित्त्याचे’ आता देशात विविध प्रकारे स्वागत साजरे केले जात आहे. त्यात जैवसाखळीची जागृती हा उद्देश अधोरेखित आहे.
१७ सप्टेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात चित्ते सोडण्यात आले. १९५२ ला चित्ता भारतातून नामशेष झाल्याचे घोषित केले होते.आज जगातील फक्त १७ देशांमध्ये चित्ता आढळून येतो.
भारतात झालेल्या चित्यांच्या आगमनाने विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा चित्त्या बद्दल असलेले कुतूहल लक्षात घेऊन वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या कला विभागामार्फत फेस पेंटिंगच्या माध्यमातून मुलांचे ‘ चित्त्याच्या, रूपातील मुखवटे रंगवण्यात आले. यासाठी प्रशालेतील हरहुन्नरी विद्यार्थी द्वितीज गवाणकर, ममता अंगचेकर, अनिरुद्ध गायकवाड, श्रेया चांदरकर या विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे सुंदर मुखवटे रंगवले .
यासाठी इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग दर्शवला. यासाठी प्रशालेतील सहाय्यक शिक्षक श्री भूषण गावडे यांचे सहकार्य लाभले, मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांच्या प्रेरणेने हा उपक्रम यशस्वी झाला. यावेळी चित्त्याच्या मुखवट्यातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन चित्यांविषयी माहिती दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या पर्यावरणात प्रत्येक प्राण्याचे महत्त्व फार मोलाचे आहे याची जाणीव जागृती मुलांमध्ये निर्माण झाली .या उपक्रमास कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळाचेे अध्यक्ष अजयराज वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.