24.2 C
Mālvan
Thursday, December 12, 2024
IMG-20240531-WA0007

देवगड तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समाज सहभागातून किनारे स्वच्छता मोहीम संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : २०२२ सालच्या विविध राष्ट्रीय उपक्रमांपैकी ‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी’ वर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्यावरण आयाम ,सागरी सीमा मंच यांच्या माध्यमातून १७ सप्टेंबर २०२२ ले सागर किनारा स्वच्छता अभियान देवगड तालुक्यामध्ये संपन्न झाले. देवगड मधील राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ व देवगड जामसंडे नगरपंचायत तसेच मिठमुंबरी, कुणकेश्वर,मिठबाव व विजयदुर्ग येथील ग्रामपंचायती व हायस्कूल तसेच स.ह.केळकर महाविद्यालय देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने सागर किनारा स्वच्छता अभियान संपन्न झाले.

यामध्ये देवगड येथील तारामुंबरी व देवगड बीच तसेच मिठबाव , मिठमुंबरी, कुणकेश्वर, विजयदुर्ग येथिल बीच चा समावेश आहे . या अभियानात शालेय विद्यार्थी,शिक्षक ,देवगड येथील उपनगराध्यक्ष तसेव येथील नगरसेवक ,तसेच स्थानिक सरपंच व नागरिक या सर्वांच्या उपस्थितीत सकाळी ९ ते ११ यावेळेत किनारा स्वच्छता उपक्रम करण्यात आला ,यामध्ये एकूण – ६गावातील ४०९ विदयार्थी- विद्यार्थिनी ,(सहभागी ६ हायस्कूल व १ महाविद्यालय) व २०९ नागरिक सहभागी झाले ,सर्व ठिकाणी स्वच्छता उपक्रम पूर्ण झाल्यावर सुमारे ४०० सिमेंटची पोती बरुन प्लॅस्टिकसह अन्य कचरा जमा झाला. सर्व ठिकाणी स्वछताविषयक प्रतिज्ञा व अभियानाची माहिती, देण्यात आली ,देवगड येथील कार्यक्रमात देवगड नगर पंचायत च्या २ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात वृक्ष भेट देऊन रा.स्व.संघ सिंधुदुर्गचे जिल्हा संघचालक श्री रवी मराठे , व जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : २०२२ सालच्या विविध राष्ट्रीय उपक्रमांपैकी 'भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी' वर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्यावरण आयाम ,सागरी सीमा मंच यांच्या माध्यमातून १७ सप्टेंबर २०२२ ले सागर किनारा स्वच्छता अभियान देवगड तालुक्यामध्ये संपन्न झाले. देवगड मधील राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ व देवगड जामसंडे नगरपंचायत तसेच मिठमुंबरी, कुणकेश्वर,मिठबाव व विजयदुर्ग येथील ग्रामपंचायती व हायस्कूल तसेच स.ह.केळकर महाविद्यालय देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने सागर किनारा स्वच्छता अभियान संपन्न झाले.

यामध्ये देवगड येथील तारामुंबरी व देवगड बीच तसेच मिठबाव , मिठमुंबरी, कुणकेश्वर, विजयदुर्ग येथिल बीच चा समावेश आहे . या अभियानात शालेय विद्यार्थी,शिक्षक ,देवगड येथील उपनगराध्यक्ष तसेव येथील नगरसेवक ,तसेच स्थानिक सरपंच व नागरिक या सर्वांच्या उपस्थितीत सकाळी ९ ते ११ यावेळेत किनारा स्वच्छता उपक्रम करण्यात आला ,यामध्ये एकूण - ६गावातील ४०९ विदयार्थी- विद्यार्थिनी ,(सहभागी ६ हायस्कूल व १ महाविद्यालय) व २०९ नागरिक सहभागी झाले ,सर्व ठिकाणी स्वच्छता उपक्रम पूर्ण झाल्यावर सुमारे ४०० सिमेंटची पोती बरुन प्लॅस्टिकसह अन्य कचरा जमा झाला. सर्व ठिकाणी स्वछताविषयक प्रतिज्ञा व अभियानाची माहिती, देण्यात आली ,देवगड येथील कार्यक्रमात देवगड नगर पंचायत च्या २ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात वृक्ष भेट देऊन रा.स्व.संघ सिंधुदुर्गचे जिल्हा संघचालक श्री रवी मराठे , व जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

error: Content is protected !!