भाजप मालवण व बी. के. एल. वालावलकर रुग्णालय डेरवण यांचे संयुक्त आयोजन.
विवेक परब | एडिटोरिअल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर ते गांधी जयंती २ ऑटोबर या कालावधीत सेवा पंधरावडा साजरा होत आहे. याचे औचित्य साधून माजी खासदार डाॅ. निलेश राणे (महाराष्ट्र प्रदेश सचिव) यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे उद्या दिनांक २० सप्टेंबर सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर भारतीय जनता पार्टी मालवण व बी. के. वालावलकर रूग्णालय डेरवण यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीरात कँन्सर, हार्निया, मुतखडे, अल्सर, प्रोस्टेटग्रंथी, एपेंडिक्स, टाँन्सिल्स, मुळव्याध, चरबिच्या गाठी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, थायराँईड, पित्ताशयातील खडे, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, महिला गर्भाशय शस्त्रक्रिया, एम्प्लान्ट रिमुव्हर अशा शस्रक्रिया होणार आहेत.
शस्त्रक्रियांसाठी रुग्ण आढल्यास केशरी व पिवळ्या रेशनकार्ड धारकांसाठी मोफत शस्त्रक्रिया केली जाईल. रुग्णांचे तसेच मागील रिपोर्ट आवश्यक आहेत.
शिबिर नोंदणीसाठी संतोष गांवकर- 9420721819, राजु परुळेकर-8788453872, दादा नाईक-9420027629, अजिक्य पाताडे-9765477559, संतोष साटविलकर-9422584590, विनोद भोगावतकर-7875993252, महेश बागवे-9420206951, जेराँन फर्नांडिस-9423833586 राजेश तांबे-7588921209, दिपक मालवणकर-9423880991, दत्ता वराडकर-9421145923, चंदु सावंत-9420206930 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन मालवण भारतीय जनता पार्टी ग्रामिण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर व तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर यांनी केले आहे.