25.9 C
Mālvan
Sunday, October 20, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

पॅन कार्ड क्लब गुंतवणुकदारांना मिळणार दिलासा..?

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | ब्युरो न्यूज : पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा ते बारा हजार लोकांनी जवळपास १२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही पॅन कार्ड क्लब कंपनी १९९६ साली सुरू झाली होती. २०१४ साली ही कंपनी बंद झाली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच पॅन कार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांचे करोडो रुपये या कंपनीत अडकले. सात ते आठ वर्षानंतर हे पैसे परत मिळण्यासाठी पॅन कार्ड क्लब मध्ये कार्यरत असणाऱ्या प्रतिनिधींनी व राष्ट्र शक्ती संघटनेच्या वतीने हे पैसे गुंतवणूकदारांना परत मिळावे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार २३ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक रक्कम व त्या संदर्भात असलेली कागदपत्रांची माहिती ऑनलाईन पद्धतीने खालील दिलेल्या लिंकवर भरण्याचे आवाहन पॅन कार्ड क्लबचे प्रतिनिधी आदित्य पंडित, संदीप उंबळकर, अमित मराठे, संतोष सावंत व प्रकाश बेळनेकर यांनी कणकवली बांदकरवाडी मराठे हॉल येथे पार पडलेल्या बैठकीत केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा ते बारा हजार गुंतवणूकदारांचे या पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनी यामध्ये जवळपास १२० कोटी रुपये सर्वसामान्य व कष्टकरी लोकांचे अडकले आहेत. त्यामुळे आज उपस्थित गुंतवणूकदारांनी उपस्थित प्रतिनिधीकडे आमचे अडकलेले पैसे कधी मिळणार, या संदर्भात विचारणा केली व कागदोपत्री असलेल्या शंका प्रतिनिधीकडे मांडल्या. त्यामध्ये गुंतवणूकदारांची कागदपत्रे आता उपलब्ध नसतील तर काय करायचे, रिसीट उपलब्ध नाही तर काय करायचे, ज्याच्या नावावर पावती आहे ती मयत आहे, त्याला काय पर्याय यासारखे असंख्य प्रश्न या बैठकीत उपस्थितीत गुंतवणूकदारांनी प्रतिनिधींना विचारले. त्यावेळी या पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधींनी या शंकांचे निरसन करून आपण ऑनलाइन पद्धतीने २३ तारखेच्या आत खालील दिलेल्या वेबसाईटवर आपली माहिती भरावी, असे आवाहन केले.

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लिंक
pclcirp.dcirrus.co

(अधिक माहितीसाठी अमित मराठे ९४२१९०४७७०, संदीप उबळकर ७७०९४२२७३९ व पंडित ९४२१६२४२६७ यांच्याशी संपर्क करावा, असे बैठकीत प्रतिनिधींनी सांगितल्याचे सूत्रांकडून समजते आहे.)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!