संतोष साळसकर | ब्युरोचीफ : नुकत्याच रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या शास्त्रीय पख़वाज वादन स्पर्धेत देवगड तालुक्यातील आरे गावचे सुपुत्र यश प्रकाश मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
रायगड जिल्ह्यात ज्या शास्त्रीय पकवाद वादन स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते त्यात रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्हयातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
देवगड तालुक्यातील आरे गावचे सुपुत्र यश मेस्त्री यांनी स्पर्धेत उत्कृष्ट पख़वाज सादरीकरण करुन प्रथम क्रमांक मिळविला आहे.
यश मेस्त्री यांना बालपणापासुन वाद्य वृंदाची आवड आहे. त्यांनी स्थानिक भजनांमध्ये पकवाद वादनाची सुरुवात केली. आरे गावचे कोकणकला भूषण सुप्रसिध्द भजनी बुवा कै.चंद्रकांत कदम यांनी हरिनाम भजनामधून आरे गावचे नाव साता समुद्रा पार उज्वल केलेले आहे. यामुळे पख़वाज वादनामध्येही यश मेस्त्री यांच्या कामगिरीने आरे गावचे नाव पख़वाज म वादनामध्येही प्रसिध्द होत आहे.
आरे गांवचे उपसरपंच महेश पाटोळे, ग्रामसेवक केतन जाधव यांनी मेस्त्री यांचे या यशाबददल प्रशंसा केली आहे.
अभिनंदन