25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

ऊब मायेची,मदत प्रेमाची

- Advertisement -
- Advertisement -

दक्षिण मुंबई कॅटरिंग संघ आणि इव्हेंटग्रुप,शिवडी तर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांना साड्या व चादर आदी वस्तूंचे वाटप

संतोष साळसकर / शिरगाव : दक्षिण मुंबई केटरिंग संघ आणि इवेंट्स ग्रुप, शिवडी मुंबई यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन शंकरवाडी चिपळूण येथील ग्रामस्थांना चादर, साडी, टॉवेल, ब्लॅंकेट आद वाटप करण्यात आले.
“गरीब गरजू म्हणून नव्हे तर पुराच्या संकटात घरातील गाद्या, सतरंज्या सह कपडे, पुस्तके सर्वच नष्ट झाले असे रहिवासी हे असल्यामुळे आम्ही हा साहित्य पुरवठा करत आहोत” अश्या शब्दात नितीन कोलगे यांनी उपक्रमाचा उद्देश मनोगताद्वारे स्पष्ट केला.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शंकरवाडी आणि परिसर पाण्याखाली येऊन प्रचंड प्रमाणावर वित्तहानी झाली होती.त्या घटनेची दखल घेत कॅटरिंग ग्रुपच्या नितीन कोलगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली फत्तेसिंग गुजर,संतोष आडविलकर विनायक मुंज, शेखर छत्रे यांनी स्थानिक ग्रामसेवक रवींद्र पतीयाने, अमोल बेर्डे अमोल टाकळे यांच्या सहकार्याने ,परिसराची पाहणी करून पूरग्रस्तांना मदतीच्या किटचे वाटप केले. ह्याच वाटपादरम्यान ‘आकार’ या संस्थेच्या कुसुम कदम आणि सहकारी यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा परिचय झाला.
गुढघ्यापर्यंत साठलेल्या गाळातून अडकलेल्या प्लास्टिक च्या बाटल्या पिशव्या आणि वस्तू गोळा करून ह्या कचरासेविका ह्या वस्तूंची विक्री करून त्यातून मिळालेल्या पैश्यातून खर्च वजा करून उर्वरीत रक्कम ग्रामपंचायतीला देतात. त्यांच्या या उदात्त कार्याची दखल घेत कॅटरिंग ग्रुपच्या वतीने या समाजसेवी संस्थेचा छोटीशी भेट देऊन गौरव करण्यात आला. तसेच या कचरावेचक सेविकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संतोष शेट्ये, संतोष कोटकर, महेश कदम, नवनाथ परब, भालचंद्र जाधव,व अमृता चव्हाण यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.”गरिब गरजू म्हणून नव्हे तर पुराच्या संकटात घरातील गाद्या,सतरंज्या यासह कपडे,पुस्तके आदी सर्वच चीजवस्तू नष्ट झाल्यामुळे आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून कोकणातील आपल्या या बांधवांना ना हा साहित्यपुरवठा करीत आहोत ,असे दक्षिण मुंबई कॅटरिंग संघाचे नितिन कोलगे यांनी आपल्या या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

  1. खूपच चांगले कार्य केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
    असेच सामाजिक कार्य करत आपले कार्य चालू ठेवा.
    आपणांस पुढील कार्यासाठी शुभेच्छा!

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

दक्षिण मुंबई कॅटरिंग संघ आणि इव्हेंटग्रुप,शिवडी तर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांना साड्या व चादर आदी वस्तूंचे वाटप

संतोष साळसकर / शिरगाव : दक्षिण मुंबई केटरिंग संघ आणि इवेंट्स ग्रुप, शिवडी मुंबई यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन शंकरवाडी चिपळूण येथील ग्रामस्थांना चादर, साडी, टॉवेल, ब्लॅंकेट आद वाटप करण्यात आले.
"गरीब गरजू म्हणून नव्हे तर पुराच्या संकटात घरातील गाद्या, सतरंज्या सह कपडे, पुस्तके सर्वच नष्ट झाले असे रहिवासी हे असल्यामुळे आम्ही हा साहित्य पुरवठा करत आहोत" अश्या शब्दात नितीन कोलगे यांनी उपक्रमाचा उद्देश मनोगताद्वारे स्पष्ट केला.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शंकरवाडी आणि परिसर पाण्याखाली येऊन प्रचंड प्रमाणावर वित्तहानी झाली होती.त्या घटनेची दखल घेत कॅटरिंग ग्रुपच्या नितीन कोलगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली फत्तेसिंग गुजर,संतोष आडविलकर विनायक मुंज, शेखर छत्रे यांनी स्थानिक ग्रामसेवक रवींद्र पतीयाने, अमोल बेर्डे अमोल टाकळे यांच्या सहकार्याने ,परिसराची पाहणी करून पूरग्रस्तांना मदतीच्या किटचे वाटप केले. ह्याच वाटपादरम्यान 'आकार' या संस्थेच्या कुसुम कदम आणि सहकारी यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा परिचय झाला.
गुढघ्यापर्यंत साठलेल्या गाळातून अडकलेल्या प्लास्टिक च्या बाटल्या पिशव्या आणि वस्तू गोळा करून ह्या कचरासेविका ह्या वस्तूंची विक्री करून त्यातून मिळालेल्या पैश्यातून खर्च वजा करून उर्वरीत रक्कम ग्रामपंचायतीला देतात. त्यांच्या या उदात्त कार्याची दखल घेत कॅटरिंग ग्रुपच्या वतीने या समाजसेवी संस्थेचा छोटीशी भेट देऊन गौरव करण्यात आला. तसेच या कचरावेचक सेविकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संतोष शेट्ये, संतोष कोटकर, महेश कदम, नवनाथ परब, भालचंद्र जाधव,व अमृता चव्हाण यांचेही मोलाचे सहकार्य लाभले."गरिब गरजू म्हणून नव्हे तर पुराच्या संकटात घरातील गाद्या,सतरंज्या यासह कपडे,पुस्तके आदी सर्वच चीजवस्तू नष्ट झाल्यामुळे आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून कोकणातील आपल्या या बांधवांना ना हा साहित्यपुरवठा करीत आहोत ,असे दक्षिण मुंबई कॅटरिंग संघाचे नितिन कोलगे यांनी आपल्या या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले.

error: Content is protected !!