24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

इन्सुलीच्या महिलेचा गोव्यात दुर्दैवी अंत;हाकेच्या अंतरावर माहेर असताना पोचू शकल्या नाहीत दुर्गाई..!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा |राकेश परब : गोवा राज्यातील मडकईवाडा-वझरी (ता. पेडणे) येथे दुचाकी व ट्रक या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दुर्गाई सुरेश सावंत (वय ५२, रा. इन्सुली) या महिलेचा जागीच अंत झाली. त्यांच्या वडिलांचे काल श्राद्ध असल्याने भावासोबत त्या दुचाकीवरून माहेरी जात होत्या. घर केवळ ३०० मीटर अंतरावर असतानाच हा अपघात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी वडिलांचे श्राद्ध असल्याने दुर्गाई या आपला भाऊ सिद्धेश सूर्या सावळ यांच्यासोबत इन्सुली येथून गोव्यात जातं होत्या. स्कूटरच्या ( जीए ०३ जे ४६६८ ) मागे त्या बसल्या होत्या. मडकईवाडा- वझरी वळणावर धारगळला ते आले असता ट्रकच्या (जीए ०३ के ९ ३३० ) मागच्या टायरला स्कूटरची धडक बसली. या अपघातात दुर्गाई सावंत यांच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्या जागीच दगावल्या. तर स्कूटरचालक सिद्धेश सुदैवाने बचावला. अपघातापासून त्यांचे घर हाकेच्या अंतरावर राहिले होते. मोपा (पेडणे) पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
इन्सुली येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा |राकेश परब : गोवा राज्यातील मडकईवाडा-वझरी (ता. पेडणे) येथे दुचाकी व ट्रक या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दुर्गाई सुरेश सावंत (वय ५२, रा. इन्सुली) या महिलेचा जागीच अंत झाली. त्यांच्या वडिलांचे काल श्राद्ध असल्याने भावासोबत त्या दुचाकीवरून माहेरी जात होत्या. घर केवळ ३०० मीटर अंतरावर असतानाच हा अपघात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी वडिलांचे श्राद्ध असल्याने दुर्गाई या आपला भाऊ सिद्धेश सूर्या सावळ यांच्यासोबत इन्सुली येथून गोव्यात जातं होत्या. स्कूटरच्या ( जीए ०३ जे ४६६८ ) मागे त्या बसल्या होत्या. मडकईवाडा- वझरी वळणावर धारगळला ते आले असता ट्रकच्या (जीए ०३ के ९ ३३० ) मागच्या टायरला स्कूटरची धडक बसली. या अपघातात दुर्गाई सावंत यांच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्या जागीच दगावल्या. तर स्कूटरचालक सिद्धेश सुदैवाने बचावला. अपघातापासून त्यांचे घर हाकेच्या अंतरावर राहिले होते. मोपा (पेडणे) पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
इन्सुली येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!