मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या नगरपरिषदेच्या व्यायाम शाळेसाठी ठेकेदाराने उपलब्ध करून दिलेल्या साहित्यात त्रुटी असल्याचे लोकार्पणाच्या दिवशीच निदर्शनास आले व आमदार वैभव नाईक यांनी तत्काळ संबंधित ठेकेदाराला साहित्यातील त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले.
जोपर्यंत त्या त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत ठेकेदाराला बिल अदा न करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी पालिका प्रशासनालाही दिल्या होत्या. त्यामुळे माजी खासदार निलेश राणें यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर अपूर्ण माहितीचा आधार घेत केलेत व त्या आरोपांत बिलकुल ‘दळ’ तथा तत्थ्य नाही असे पालिकेचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी स्पष्ट केले.
आमदारांवर फसवणुकीचा आरोप करणाऱ्या माजी खासदारांनी तोंडवळी येथील बंधाऱ्यासाठी १० कोटीचे आश्वासन दिले त्याचा अद्याप पत्ताच नाही ही लोकांची फसवणूक नाही का व त्यासोबतच देवबाग बंधाऱ्याचे उदघाटन झाल्यावर त्याचे काम आता सत्ता आल्यावर का सुरू झाले नाही याचे उत्तर भाजपच्या नेत्यांनी व इतर समर्थकांनी जनतेला द्यावे असे प्रतिपादन माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती व नगरसेवक मंदार केणी यांनी केले आहे .