मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनचे दहा ते बारा फुटी जड लोखंडी गेट अंगावर कोसळून गोडाऊनचे कर्मचारी बुलाजी (भाई) चंद्रकांत चव्हाण यांचा नुकताच दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या कातवड-खैदा येथील घरी भेट देऊन चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मनोज मोंडकर उपस्थित होते.