- सेक्रेटरीपदी अशोक मसुरेकर यांची बिनविरोध निवड
प्रतिनिधी/ मसुरे : मसुरे येथील माता काशिबाई महादेव परब मेमोरियल च्यारीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महादेव परब यांची तर सेक्रेटरी पदी अशोक रामचंद्र मसुरेकर यांची बिनविरोध निवड मसुरे येथे करण्यात आली. कामगार नेते स्वर्गीय जयवंत परब यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदी प्रकाश परब यांची निवड एकमताने करण्यात आली. यावेळी माता काशिबाई महादेव परब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक डॉक्टर सुधीर मेहंदळे, माजी जिप अध्यक्ष व शाळा समितीचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, अशोक रामचंद्र मसुरेकर, अजय प्रभुगावकर, वासुदेव धारगळकर, दत्तप्रसाद पेडणेकर, बाबाजी भोगले, तातू भोगले, राजू प्रभुगावकर आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रकाश परब म्हणाले, स्वर्गीय जयवंत परब यांनी लावलेला हा वृक्ष आज शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे कार्य करत आहे. शिक्षण क्षेत्रात जयवंत परब यांचे राहिलेले अपूर्ण कार्य यापुढे मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या साथीने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. या भागातून इंग्लिश भाषेतून शिक्षण घेताना येथील विद्यार्थी कधीही मागे पडणार नाहीत व ही प्रशाला आणि हे ट्रस्ट यापुढेही जोमाने शिक्षण क्षेत्रात कार्य करेल. यासाठी काहीही कमी पडायला मी देणार नाही.तसेच भविष्यात ही शिक्षण संस्था व हे ट्रस्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर वन दिसेल असे आश्वासन यावेळी बोलताना परब यांनी दिले. डॉक्टर सुधीर मेहंदळे यांनी भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल आणि ट्रस्ट ला अजून चांगली अवस्था आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत योग्य त्या सूचना केल्या. सूत्रसंचालन, प्रास्ताविक, संग्राम प्रभुगावकर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक किशोर देऊलकर, गौतमी प्रभुगावकर, संजना प्रभुगावकर, सायली म्हाडगुत, रंजनी सावंत, सिद्धी सांडव, रेश्मा बोरकर, पार्वती
कोदे, सानिका बांदिवडेकर, स्टेला लोबो, स्वरांजली ठाकूर, गौरव तोंडवळकर आदी उपस्थित होते.