आजपासून रात्री ८:३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर…!
नेरुरवासियांनी केले समस्त मराठी व मालवणी रसिकांना आवाहन.
कुडाळ-नेरूर । देवेंद्र गावडे (उपसंपादक) : कोकणचे निसर्ग सौंदर्य भल्या भल्यांना भुरळ पाडते. त्यात मग मराठी-हिंदी मनोरंजन सृष्टीचाही समावेश आहे व आता तो वाढत जात आहे.
अलिकडच्या काळात मालिका-चित्रपटांसाठी ‘स्पाॅट’ निश्चित करता करता इथल्या ‘गुणवत्ते’वर देखील या सिनेसृष्टीने आपलं लक्ष केंद्रित केले आणि इथली गुणवत्ता झळाझून निघाली.
नेरूरसारख्या ग्रामीण भागातील पण तरीही ग्रामदैवत श्री देव कलेश्वराचा वरदहस्त घेऊन वाटचाल करणा-या अनेक दिग्गज कलावंतांनी मराठी-हिंदी सिने-नाट्यसृष्टीमध्ये आपला ठसा उमटवला.
आता मात्र त्यावर कळस चढवलाय तो बालकलाकार कु. रूची संजय नेरूरकर या गुणी बाल अभिनेत्रीने अर्थात् सर्वांच्या लाडक्या ‘बयो’ने..!
सोनी मराठीसारख्या मोठ्या चॅनेलवरून प्रसारीत होणा-या ‘बयो’ या मालिकेसाठी तिची प्रमुख भुमिकेसाठी निवड झाली आहे. यासाठी तिचे आई-वडील, गुरूजन, हितचिंतक, मार्गदर्शक इत्यादिंच बहुमोल योगदान लाभले.
कु. रूची ही अत्यंत गुणी व मेहनती मुलगी आहे. ती या भुमिकेला निश्चितच न्याय देईल अशी तिला जाणणार्या कला रसिकांची खात्री आहे.
‘छोट्या बयोची..मोठ्ठी स्वप्नं..’, अशी टॅगलाईन घेऊन सुरू होणारी ही मराठी मालिका सोनी मराठी चॅनेलवर आज सोमवार दिनांक १२ सप्टेंबर २०२२ पासून रात्रौ ८.३० वाजता सुरू होत आहे.
या मालिकेच्या शुभारंभासाठी नेरूरवासियांकडून तसेच विविध स्तरांमधून छोट्या बयोवर कु. रूची संजय नेरूरकर हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सर्व मराठी,मालवणी रसिक प्रेक्षकांनी ही मालिका आवर्जून पहावी व आपली कौतुकाची थाप आमच्या छोट्या बयोला मिळावी अशा भावना व प्रेमळ आवाहन नेरुरवासीय करत आहेत.