तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तारकर्ली गावाची शनिवारी पहाटे 03:00 वाजता अचानक वीज गेली ती थेट रविवार रात्री आठ वाजता लाईट आली .11 केव्ही तार तारकर्ली कोळंबी येथे रात्री तुटली तर यांना दुसरे दिवशी रात्र का उजाडत आहे असा प्रश्न ग्राहक करत आहेत. सध्या तारकर्ली देवबागचा वीज पुरवठा नसणे ही वीज वितरण मंडळाचे नित्याचेच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. .विद्युत मंडळ मात्र वारंवार वीज जात असली तरी बिलात ग्राहकांना प्रत्येक वेळी एक एक युनिटचा भुर्दंड वाढवत असल्याचेही ग्राहक सांगतात.
सध्या वीज वितरण बद्दल तारकर्ली देवबाग ग्रामस्थ प्रचंड नाराज असून यासंदर्भात लवकरात लवकर ठोस पावले उचलली जावीत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.