24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

“भजना करुची आसत तर घे रे बुवा पेटी कपाळार..!” ( आशिया चषक विशेष)

- Advertisement -
- Advertisement -

देवेंद्र गावडे | कुडाळ (नेरुर) उपसंपादक : “भजना करूची आसतीत तर घे रे बुवा झक् मारीत पेटी कपाळार..”, असेच काहीसे कर्णधार रोहित शर्माला संकेत देत राहुल नि कोहली बेफिकिरपणे मागे तंबूत परतले.
रोहितने संघाचा भार खरोखरंच खांद्यावर घेतला आणि ज्या खेळपट्टीवर इतरांच्या ‘चिपळ्या’ वाजत होत्या त्या खेळपट्टीवर 41 चेंडूत 72 धावा चोपून काढल्या.
आपल्याला त्याचा प्रयत्नांची पाराकाष्ठा करण्याचा अंदाज फार आवडतो आणि शंभर टक्के समर्पण भावते.
माणुस कसा अगदी इमोशनल असला पाहीजे. आपण जे काही करतोय त्याच्या सोबत आपली ‘इमोशनल अटॅचमेंट’ असलीच पाहीजेत तरो अचंबित करणारे इतिहास हातून घडून जातात…!
“मला तुमच्या देशातील तरूणांच्या ओठावर रूळणारी ‘गाणी’ सांगा मी तूम्हाला तुमच्या देशाचे ‘भवितव्य’ सांगतो हेच क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर ,”मला तूम्ही तुमच्या दिवाणखान्यातील भिंतीवरच्या शोकेसमधील ,कंप्यूटरच्या स्क्रिनवरील,मोबाईलच्या स्क्रिनवरील झळकणा-या तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूचे नांव सांगा
मी तुम्हाला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांचे निकाल किंवा गेलाबाजार त्यातील चुरशीचे मापदंड सांगतो”, असे म्हणावे लागेल.

जवळपास एकशे ऐंशी धावांचा डोंगर उभा करूनही पाकिस्तान विरूद्ध म्हणा किंवा एकशे सत्तर धावांच लक्ष श्रीलंकेसमोर म्हणा
आपण दोन्ही वेळेसही ‘निश्चिंत’ नव्हतो कारण आपल्याकडे ‘गोलंदाज’ नाहीत हे आपल्याला बॅक ऑफ द माइंड् पक्के माहिती होते. आपल्याकडे समोरच्या संघाला हमखास ‘गारद’ करू शकतील किंवा समोरच्या संघात आपल्या बोलिंगने ‘दहशत’ निर्माण करू शकतील असे गोलंदाज घडतीलच कसे?
प्रत्येकाला पहिली ‘बॅटिंग’च तर हवी असते. प्रत्येकाला गावसकर,तेंडूलकर,कोहली,धोनी बनायचे असते अगदी प्रत्येक छोट्या क्रिकेटपटूच्या पालकांनादेखील पाल्याने तेंडुलकर,रोहित,विराट,मिथाली राज,शेफाली शर्मा, स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर नाहीतर अंजुम चोप्रा बनावेसे वाटते. कपिल देव,जवागल श्रीनाथ,मदनलाल, बुमराह, वेंकटेश प्रसाद किंवा झुल्लन गोस्वामी बनावेसे वाटणे हे पहिले प्राधान्य नसतेच. त्यातल्या त्यात अब्दुल कादीर, शेन वाॅर्न व अनिल कुंबळे यांच्यामुळे ‘लेगस्पिनर बना’ असे सल्ले जरुर मिळतात.

वसीम,शोएब,गार्नर,हॅडली,मॅक्ग्रा ,मिचेल् जाॅन्सन वगैरे आपल्याला थोडीच घडवायचे असतात..?
‘आग ओकणारी गोलंदाजी’..हा भारतीय क्रिकेटचा कधीच प्रमुख अजेंडा राहिला नाही हे वास्तव आहे. आशिया चषकाचा विचार करता कटू आहे पण सत्य आहे की पाकिस्तानी संघाकडे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रकारात उत्तम ‘तिखट व चिवट’ पर्याय उपलब्ध आहेत म्हणून तो संघ इतर संघांपेक्षा किंचित वरचढ ठरतो.

त्यातही भारतीय संघात पूर्वीपासूनचं ‘खेळाडू’ कमी आणि ‘स्टार’ जास्त असतात त्यामुळे परस्पर समन्वय हा कळीचा मुद्दा

पांड्या एका मॅचनंतर स्टार झाला आता पूढच्या सामन्यांमध्येजीव ओतून खेळलेच पाहीजे असे काही नाही अशा अविर्भावातचं तो वावरताना दिसतोय ही खंत आहे. आपली जागा ‘सेफ’ व्हावी ही वृत्ती यासारखा आपल्या प्रगतीतील दुसरा कोणता अडथळा नाही. साचलेल्या पाण्याचे कालांतराने डबकेच होते हे शास्त्र त्रिकालाबाधित आहे.

परफाॅर्मन्स् सुद्धा तसाच वाहत्या पाण्यासारखा नितळ खळाळत वाहत पुढे पुढे जाणारा व संघाला पुढे नेणार असेल तरच तो ‘चलनी परफाॅरमन्स ..!’

आशियाई संघाना फिरकी गोलंदाजांच्या विरोधात खेळणे म्हणजे डाव्या हाताचं कसब वाटतं त्यामुळे फिरकी गोलंदाजांकडून त्यातही ’20-20′ क्रिकेट प्रकारात जास्त अपेक्षा बाळगणे म्हणजे दुबईमध्ये धो धो पाऊस कोसळण्या इतक्याच दुर्मिळ चित्राची अपेक्षा बाळगण्यासारखं आहे असे म्हणावे लागेल.

पंत आणि चायना आयटम मध्ये फारसा फरक नाही चले तो ‘चांद’ तक नही तो ‘शाम’ तक अशी त्याची त-हा आहे. यष्ट्यांमागच्या कामगिरीची ‘7’ रंगी कमतरता सातत्याने जाणवते एवढं मात्र निश्चित..!
भारतीय क्रिकेट संघ आता आशिया चषक स्पर्धेतून जवळपास बाहेर पडल्यातच जमा आहोत. वाईट एवढ्याच गोष्टीचे वाटतं की क्षमता असूनही फायनलपर्यंत पोहचू शकलो नाही त्याचे.

‘दुस-यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’ त्यामूळे जर तरला फार काही महत्व नाही.

ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे म्हणतात त्याप्रमाणे ,”अवास्तव ‘खर्च’ झाला..म्हणून जास्त त्रास होत नाही पण त्याचा ‘हिशेब’ लागला नाही की जास्त त्रास होतो..!”

देवेंद्र गावडे ( उपसंपादक, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

देवेंद्र गावडे | कुडाळ (नेरुर) उपसंपादक : "भजना करूची आसतीत तर घे रे बुवा झक् मारीत पेटी कपाळार..", असेच काहीसे कर्णधार रोहित शर्माला संकेत देत राहुल नि कोहली बेफिकिरपणे मागे तंबूत परतले.
रोहितने संघाचा भार खरोखरंच खांद्यावर घेतला आणि ज्या खेळपट्टीवर इतरांच्या 'चिपळ्या' वाजत होत्या त्या खेळपट्टीवर 41 चेंडूत 72 धावा चोपून काढल्या.
आपल्याला त्याचा प्रयत्नांची पाराकाष्ठा करण्याचा अंदाज फार आवडतो आणि शंभर टक्के समर्पण भावते.
माणुस कसा अगदी इमोशनल असला पाहीजे. आपण जे काही करतोय त्याच्या सोबत आपली 'इमोशनल अटॅचमेंट' असलीच पाहीजेत तरो अचंबित करणारे इतिहास हातून घडून जातात…!
"मला तुमच्या देशातील तरूणांच्या ओठावर रूळणारी 'गाणी' सांगा मी तूम्हाला तुमच्या देशाचे 'भवितव्य' सांगतो हेच क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर ,"मला तूम्ही तुमच्या दिवाणखान्यातील भिंतीवरच्या शोकेसमधील ,कंप्यूटरच्या स्क्रिनवरील,मोबाईलच्या स्क्रिनवरील झळकणा-या तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूचे नांव सांगा
मी तुम्हाला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांचे निकाल किंवा गेलाबाजार त्यातील चुरशीचे मापदंड सांगतो", असे म्हणावे लागेल.

जवळपास एकशे ऐंशी धावांचा डोंगर उभा करूनही पाकिस्तान विरूद्ध म्हणा किंवा एकशे सत्तर धावांच लक्ष श्रीलंकेसमोर म्हणा
आपण दोन्ही वेळेसही 'निश्चिंत' नव्हतो कारण आपल्याकडे 'गोलंदाज' नाहीत हे आपल्याला बॅक ऑफ द माइंड् पक्के माहिती होते. आपल्याकडे समोरच्या संघाला हमखास 'गारद' करू शकतील किंवा समोरच्या संघात आपल्या बोलिंगने 'दहशत' निर्माण करू शकतील असे गोलंदाज घडतीलच कसे?
प्रत्येकाला पहिली 'बॅटिंग'च तर हवी असते. प्रत्येकाला गावसकर,तेंडूलकर,कोहली,धोनी बनायचे असते अगदी प्रत्येक छोट्या क्रिकेटपटूच्या पालकांनादेखील पाल्याने तेंडुलकर,रोहित,विराट,मिथाली राज,शेफाली शर्मा, स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर नाहीतर अंजुम चोप्रा बनावेसे वाटते. कपिल देव,जवागल श्रीनाथ,मदनलाल, बुमराह, वेंकटेश प्रसाद किंवा झुल्लन गोस्वामी बनावेसे वाटणे हे पहिले प्राधान्य नसतेच. त्यातल्या त्यात अब्दुल कादीर, शेन वाॅर्न व अनिल कुंबळे यांच्यामुळे 'लेगस्पिनर बना' असे सल्ले जरुर मिळतात.

वसीम,शोएब,गार्नर,हॅडली,मॅक्ग्रा ,मिचेल् जाॅन्सन वगैरे आपल्याला थोडीच घडवायचे असतात..?
'आग ओकणारी गोलंदाजी'..हा भारतीय क्रिकेटचा कधीच प्रमुख अजेंडा राहिला नाही हे वास्तव आहे. आशिया चषकाचा विचार करता कटू आहे पण सत्य आहे की पाकिस्तानी संघाकडे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रकारात उत्तम 'तिखट व चिवट' पर्याय उपलब्ध आहेत म्हणून तो संघ इतर संघांपेक्षा किंचित वरचढ ठरतो.

त्यातही भारतीय संघात पूर्वीपासूनचं 'खेळाडू' कमी आणि 'स्टार' जास्त असतात त्यामुळे परस्पर समन्वय हा कळीचा मुद्दा

पांड्या एका मॅचनंतर स्टार झाला आता पूढच्या सामन्यांमध्येजीव ओतून खेळलेच पाहीजे असे काही नाही अशा अविर्भावातचं तो वावरताना दिसतोय ही खंत आहे. आपली जागा 'सेफ' व्हावी ही वृत्ती यासारखा आपल्या प्रगतीतील दुसरा कोणता अडथळा नाही. साचलेल्या पाण्याचे कालांतराने डबकेच होते हे शास्त्र त्रिकालाबाधित आहे.

परफाॅर्मन्स् सुद्धा तसाच वाहत्या पाण्यासारखा नितळ खळाळत वाहत पुढे पुढे जाणारा व संघाला पुढे नेणार असेल तरच तो 'चलनी परफाॅरमन्स ..!'

आशियाई संघाना फिरकी गोलंदाजांच्या विरोधात खेळणे म्हणजे डाव्या हाताचं कसब वाटतं त्यामुळे फिरकी गोलंदाजांकडून त्यातही '20-20' क्रिकेट प्रकारात जास्त अपेक्षा बाळगणे म्हणजे दुबईमध्ये धो धो पाऊस कोसळण्या इतक्याच दुर्मिळ चित्राची अपेक्षा बाळगण्यासारखं आहे असे म्हणावे लागेल.

पंत आणि चायना आयटम मध्ये फारसा फरक नाही चले तो 'चांद' तक नही तो 'शाम' तक अशी त्याची त-हा आहे. यष्ट्यांमागच्या कामगिरीची '7' रंगी कमतरता सातत्याने जाणवते एवढं मात्र निश्चित..!
भारतीय क्रिकेट संघ आता आशिया चषक स्पर्धेतून जवळपास बाहेर पडल्यातच जमा आहोत. वाईट एवढ्याच गोष्टीचे वाटतं की क्षमता असूनही फायनलपर्यंत पोहचू शकलो नाही त्याचे.

'दुस-यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला' त्यामूळे जर तरला फार काही महत्व नाही.

ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे म्हणतात त्याप्रमाणे ,"अवास्तव 'खर्च' झाला..म्हणून जास्त त्रास होत नाही पण त्याचा 'हिशेब' लागला नाही की जास्त त्रास होतो..!"

देवेंद्र गावडे ( उपसंपादक, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)

error: Content is protected !!