पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर आणि शिवसेना आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांच्या घरच्या गणपतींचे घेतले दर्शन.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : आपली सिंधुनगरी चॅनेल समुहाच्या सदस्यांनी आचरा विभागातील गणपतींचे दर्शन घेतले.
यावेळी चॅनेल समूहाचे संस्थापक व मुख्य संचालक व मुख्य संपादक सुयोग पंडित, मुख्य संचालक सौ. फिलोमीना पंडित , समूहाच्या काॅर्पोरेट कन्सल्टंट दीपा पुजारे कदम व मालवण वायरी येथील उद्योजक राजेश चव्हाण (गांवकर) उपस्थित होते.
यावेळी सर्व सदस्यांनी पळसंब सरपंच व शिवसेना आचरा विभाग संघटक श्री चंद्रकांत गोलतकर यांच्या गणपतीचे दर्शन घेतले व पळसंब गावातील काही इतर गणपतींचेही दर्शन घेतले.
यानंतर चिंदर लब्देवाडी येथील लब्दे ब्राह्मण देवालयात समूहाच्या दर्शन घेतले आणि शिवसेना आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांच्या मातोश्री व परिवार उपस्थित होते.