22.8 C
Mālvan
Monday, November 25, 2024
IMG-20240531-WA0007

विजय केनवडेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर डागली तोफ…!

- Advertisement -
- Advertisement -

भाजपा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी बिच क्लिनिंग मशीनचा उपयोग,मशीनचा ठेका आणि ठेकेदारावर उठवले सवाल..!

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर प्रशासनाला ठोस जाब कधी विचारणार अशी केनवडेकर यांची विचारणा.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी आमदार वैभव नाईक,माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्यावर प्रसिद्धीपत्राद्वारे टीका करत विविध सवालांची विचारणा केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या किनारे स्वच्छतेसाठीचे ‘बिच क्लिनिंग मशिन’ सिंधुदुर्गात दाखल झाले . आमदार वैभव नाईक यांनी त्याचा शुभारंभ केला. सिंधुदुर्ग जिल्ल्यासाठी एकमेव बीच क्लिनिंग मशिन पर्यटन मंत्रालयाने दिली आहे. उपलब्ध झालेली मशिन जे.सी.पीचे आधुनिकरण केलेले मशिन आहे. बिच क्लिर्निंग मशीन हे वाळूतील कचरा गोळा करून एकत्र करून तो बाहेर पडला पाहिजे अशी मशिन आवश्यक असताना आधुनिक मंगायाने कचरा गोळा करणाचे मशिन उपलब्ध करून दिले आहे. या मशिनने ओल्या वाळूसकट कचरा एकत्र होत आहे. यांचे विभाजन करणे कठीण होत आहे. भिक नको कुत्रे आवर अशी परिस्थिती झाली आहे.बिच क्लिनिंग मशिन व ऑपरेटिंग ठेका कंपनीला वर्षासाठी ठेका दिला असून एक वर्षाने हि मशिन जिल्हा प्रशासना कडे हस्तांतरीत करावयाची आहे.
बारा महिन्याचा ठेक्यासाठी एक कोटी पन्नास लाख शासनाने दिले आहेत. ठेकेदार मालामाल झाला आहे. बिच क्लिनिंग मशिन बारा महिन्याचा ठेका असला तरी ती फक्त आठ महिनेच चालणार आहे. पावसाळ्याचे पाच महिने समुद्र किनारे बंद असतात.
भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे काही हिशेबदेखील स्पष्ट केले आहेत ते खालीलप्रमाणे .

नविनJCP माशिन किंमत – ३५,००,०००/-
मशिन डिझेल खर्च =१०८००००/-
ऑपरेटर पगार =२५००००/-
मशिन मेन्टनस देखभाल = २०००००/-
इतर खर्च = २०००००/-
ठेकेदाराला नफा महिना ७५,०००/- प्रमाणे = ९०००००/-
असा सर्व खर्च धरला तरी वर्षाला६० ते ६५ लाख पर्यंतच खर्च होऊ शकतो.
नवीन बिच क्लिनिंग मशिनचा ऑपरेटींग व देखभालीचा ठेका जास्तीत जास्त ७० ते ७५ लाखा पर्यंत होणाऱ्या किमतीच ठेका दिड कोटीला देणे म्हणजे जनतेचा पैशाला चुना लावल्या सारखा आहे.
आमदारानी सर्व सुविधा उपलब्ध असणारी मशिनचा आग्रह का धरला नाही. एक वर्षा नंतर कोण माशिन ऑपरेट करणार हे जिल्हा प्रशासनालाच माहित नाही. सिंधुदुर्गातील नगरपालिका, ग्रामपंचायत यांना कचरा उचलण्यासाठी काय व्यवस्था करणार यासाठी नियोजन नाही अशी एकंदरच स्थिती असताना लोकापर्ण सोहळा करणे म्हणजे जनतेला फसवण्यासारखे आहे असा गंभीर आरोप विजय केनवडेकर यांनी केला आहे.

जसे मालवण मधील नगरपालिकेचा, ‘अग्निशामक आमचा कडे आग्निशामक आहे’, हे केवळ दाखवण्यासाठी व सांगण्यासाठी उपलब्ध केला आहे तसाच बिच क्लिनिंग मशीनचा प्रकार आहे कारण प्रत्यक्षात शहरातील बाजारपेठेत अग्निशामक फिरू शकत नाही . नियोजन न करता फक्त श्रेय लाटण्यासाठीच शुभारंभ आमदार करणार का अशी विजय केनवडेकर यांनी विचारणा केली आहे. प्रशासनाला पाठीशी घालणारे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर प्रशासनाला जाब कधी विचारणार अशीही विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे विजय केनवडेकर यांनी विचारणा केली आहे.
मालवण बिच फेस्टीवलचा मोठा गाजावाजा करून मिरवून श्रेय घेऊन झाले. नंतर मुख्याधिकारी इंव्हेट अधिकारी झाले अशी टिका करणारे माजी नगराध्यक्ष याबाबत जाब विचारतील का असा सवाल त्यांनी केला आहे.

भाजपा तर्फे बिच क्लिनिंग मशिनची चौकशी करावी यासाठी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माजी खासदार डाॅ. निलेश राणे युवा नेते भाजपा यांचा नेतृत्वाखाली भेट घेऊन वस्तुस्थिती मांडून चौकशी करण्याची मागणी करणार असे भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

भाजपा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी बिच क्लिनिंग मशीनचा उपयोग,मशीनचा ठेका आणि ठेकेदारावर उठवले सवाल..!

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर प्रशासनाला ठोस जाब कधी विचारणार अशी केनवडेकर यांची विचारणा.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी आमदार वैभव नाईक,माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्यावर प्रसिद्धीपत्राद्वारे टीका करत विविध सवालांची विचारणा केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या किनारे स्वच्छतेसाठीचे 'बिच क्लिनिंग मशिन' सिंधुदुर्गात दाखल झाले . आमदार वैभव नाईक यांनी त्याचा शुभारंभ केला. सिंधुदुर्ग जिल्ल्यासाठी एकमेव बीच क्लिनिंग मशिन पर्यटन मंत्रालयाने दिली आहे. उपलब्ध झालेली मशिन जे.सी.पीचे आधुनिकरण केलेले मशिन आहे. बिच क्लिर्निंग मशीन हे वाळूतील कचरा गोळा करून एकत्र करून तो बाहेर पडला पाहिजे अशी मशिन आवश्यक असताना आधुनिक मंगायाने कचरा गोळा करणाचे मशिन उपलब्ध करून दिले आहे. या मशिनने ओल्या वाळूसकट कचरा एकत्र होत आहे. यांचे विभाजन करणे कठीण होत आहे. भिक नको कुत्रे आवर अशी परिस्थिती झाली आहे.बिच क्लिनिंग मशिन व ऑपरेटिंग ठेका कंपनीला वर्षासाठी ठेका दिला असून एक वर्षाने हि मशिन जिल्हा प्रशासना कडे हस्तांतरीत करावयाची आहे.
बारा महिन्याचा ठेक्यासाठी एक कोटी पन्नास लाख शासनाने दिले आहेत. ठेकेदार मालामाल झाला आहे. बिच क्लिनिंग मशिन बारा महिन्याचा ठेका असला तरी ती फक्त आठ महिनेच चालणार आहे. पावसाळ्याचे पाच महिने समुद्र किनारे बंद असतात.
भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे काही हिशेबदेखील स्पष्ट केले आहेत ते खालीलप्रमाणे .

नविनJCP माशिन किंमत - ३५,००,०००/-
मशिन डिझेल खर्च =१०८००००/-
ऑपरेटर पगार =२५००००/-
मशिन मेन्टनस देखभाल = २०००००/-
इतर खर्च = २०००००/-
ठेकेदाराला नफा महिना ७५,०००/- प्रमाणे = ९०००००/-
असा सर्व खर्च धरला तरी वर्षाला६० ते ६५ लाख पर्यंतच खर्च होऊ शकतो.
नवीन बिच क्लिनिंग मशिनचा ऑपरेटींग व देखभालीचा ठेका जास्तीत जास्त ७० ते ७५ लाखा पर्यंत होणाऱ्या किमतीच ठेका दिड कोटीला देणे म्हणजे जनतेचा पैशाला चुना लावल्या सारखा आहे.
आमदारानी सर्व सुविधा उपलब्ध असणारी मशिनचा आग्रह का धरला नाही. एक वर्षा नंतर कोण माशिन ऑपरेट करणार हे जिल्हा प्रशासनालाच माहित नाही. सिंधुदुर्गातील नगरपालिका, ग्रामपंचायत यांना कचरा उचलण्यासाठी काय व्यवस्था करणार यासाठी नियोजन नाही अशी एकंदरच स्थिती असताना लोकापर्ण सोहळा करणे म्हणजे जनतेला फसवण्यासारखे आहे असा गंभीर आरोप विजय केनवडेकर यांनी केला आहे.

जसे मालवण मधील नगरपालिकेचा, 'अग्निशामक आमचा कडे आग्निशामक आहे', हे केवळ दाखवण्यासाठी व सांगण्यासाठी उपलब्ध केला आहे तसाच बिच क्लिनिंग मशीनचा प्रकार आहे कारण प्रत्यक्षात शहरातील बाजारपेठेत अग्निशामक फिरू शकत नाही . नियोजन न करता फक्त श्रेय लाटण्यासाठीच शुभारंभ आमदार करणार का अशी विजय केनवडेकर यांनी विचारणा केली आहे. प्रशासनाला पाठीशी घालणारे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर प्रशासनाला जाब कधी विचारणार अशीही विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे विजय केनवडेकर यांनी विचारणा केली आहे.
मालवण बिच फेस्टीवलचा मोठा गाजावाजा करून मिरवून श्रेय घेऊन झाले. नंतर मुख्याधिकारी इंव्हेट अधिकारी झाले अशी टिका करणारे माजी नगराध्यक्ष याबाबत जाब विचारतील का असा सवाल त्यांनी केला आहे.

भाजपा तर्फे बिच क्लिनिंग मशिनची चौकशी करावी यासाठी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माजी खासदार डाॅ. निलेश राणे युवा नेते भाजपा यांचा नेतृत्वाखाली भेट घेऊन वस्तुस्थिती मांडून चौकशी करण्याची मागणी करणार असे भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!