शिवरामेश्वर ट्रॅव्हल्सचे श्री. बाणे पुरस्कृत ‘अधांतर’ हा कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोगही होणार.
एकवीस दिवस भरगच्च कार्यक्रमांनी सजणार उत्सव..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे २१दिवस चालणार्या गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त शनिवारी १० सप्टेंबर रोजी रात्रौ ९.३० आचरा पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रथम पारीतोषिक पाचशे, द्वितीय तीनशे, तर तृतीय दोनशे आहे.
रविवार ११सप्टेंबर रोजी रात्रौ ९.३०वाजता आचरा पंचक्रोशीतील शालेय मुलांसाठी खुली देशभक्तीपर समुह गीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.यासाठी प्रथम क्रमांक तीन हजार,द्वितीय दोन हजार,तर तृतीय एक हजार रुपये असून दोन संघांना उत्तेजणार्थ प्रत्येकी पाचशे रूपये देण्यात येणार आहेत.सोमवार १२सप्टेंबररोजी रात्रौ ९.३०वाजता ओंकार दशावतार नाट्य मंडळ राठीवडे गुंजीवाडी यांचा सिंदुरसग्राम हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे.मंगळवार १३सप्टेंबर रोजी रात्रौ ९३० वाजता निमंत्रीत पाच संघांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रथम,द्वितीय, तृतीय अनुक्रमे चार हजार, तीन हजार, दोन हजार बक्षिसे देण्यात येणार आहेत.बुधवार १४सप्टेंबर रोजी रात्रौ ९३० वाजता शिवरामेश्वर ट्रॅव्हल्स चे बाणे यांच्या सौजन्यानेअधांतर हा कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.बुधवार १५सप्टेंबररोजी रात्रौ ९३० वाजता जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम,द्वितीय, तृतीय अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार रुपये आहेत.शुक्रवार १६सप्टेंबर रोजी राजन पुजारे,बाबू हडकर,यल्लाप्पा गुरव,विनोद गवळी,धुळाजी कर्पे,जगदिश पाटील प्रायोजित जोडी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार १७ सप्टेंबर रोजी रात्रौ ९३० वाजता श्री देवी भगवती नाट्य मंडळ प्रकाश लब्दे प्रस्तुत पुष्पगणेशलिला दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.सोमवार १९सप्टेंबररोजी सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त रात्रौ १०वाजता बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा अरुण घाडी यांच्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे.मंगळवार २०सप्टेंबर रोजी आचरा समुद्र किनारी ढोलताशांच्या गजरात विसर्जन होणार आहे. तरी या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक पाडावे,व देवस्थान समितीचे अध्यक्ष मिलिंद मिराशी यांनी केले आहे.