संतोष साळसकर | ब्युरोचीफ : मुंबई गोवा द्रुतगती महामार्गावर कशेडी येथे दोन नवीन बोगद्यांची निर्मिती जलदगतीने करण्यात येत आहे.
कशेडी घाटातील या दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचे काम वेगाने सुरु आहे. या वर्ष अखेरीपर्यंत म्हणजे डिसेंबर 2022 पर्यंत पहिला बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
दुसरा बोगदा हा 2023 च्या मध्यापर्यंत सुरु होईल असा आराखडा आहे.
अंदाजे 9 कि.मी च्या चौपदरी असलेल्या या बोगद्यामुळे 1 तासाच्या प्रवासाची बचत होणार असल्याचे समजते.