विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरे गावची सर्व धर्म सलोख्याची भावना आदर्शवत असून संपूर्ण जिल्ह्यातच असा सलोखा दिसून येतो. ती या जिल्ह्याची खासियत असल्याचे मत जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी व्यक्त केले.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावी,उत्सव निर्विघ्न पणे साजरा व्हावा या दृष्टीने जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा पोलीस स्टेशन येथे आयोजित नियोजन बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. या बैठकीला आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, जिल्हा परीषद सदस्य जेराँन फर्नांडिस,आचरा सरपंच प्रणया टेमकर, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर,परेश सावंत,देवस्थान समितीचे अशोक पाडावे,प्राथमिक आरोग्य केंद्र आचराचे वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर जाधव, डॉक्टर कपिल मेस्त्री, विद्यूत मंडळ कनिष्ठ अभियंता संतोष मर्गज, तसेच जगदीश पांगे, ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, ट्रॅव्हर्ल्सचे दिनेश कांबळी, इमू मुजावर, सहाआसनी रिक्षा संघटनेचे किशोर हिर्लेकर रिक्षा संघटनेचे सुनिल आचरेकर, दिपक घाडी तसेच अब्दुल लतीफ मुजावर, सुफियान काझी, पोलीस कर्मचारी मिनाक्षी देसाई, महेश देसाई, अक्षय धेंडे, मनोज पुजारे, महेश जगताप,सौ तांबे यांसह बहुसंख्य ग्रामस्थ दक्षता समिती महिला सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आचर तिठा येथे वाहतूक कोंडी होवूनये बाजारपेठेत होणारी गर्दी,यादृष्टीने याबैठकित पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या सुचनेनुसार नियोजन करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात होणार्या खाजगी गाड्यांच्या पार्किंग मुळे अत्यावश्यक परीस्थिती वेळी अडचण होवू शकत असल्याची बाब जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस यांनी उपस्थित केली. यासाठी आवश्यक वाहनांनाच आवारात प्रवेश देण्यासाठी नियोजन केले जाईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. विद्द्युत समस्या उद्भवू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दाभाडे यांनी विद्यूत मंडळाला दिल्या. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी अनंत चतुर्थी पर्यंत वाहतूक पोलीस उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने पहाटे पाच पासून रात्रौ आठ पर्य़त सार्वजनिक ठिकाणी आरोग्य पथके तैनात केली जाणार असल्याचे आरोग्य अधिकारी जाधव यांनी सांगितले. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर स्वतः चा जीव धोक्यात घालून पर्यटकांचे प्राण वाचविणारे जिवरक्षक दलाचे जोशी, वाडेकर यांचा पोलीस अधिक्षक दाभाडे यांच्या हस्ते सत्कार केला गेला.