आपली सिंधूनगरी न्युज चॅनेलचे संस्थापक तथा मुख्य संपादक श्री. सुयोग श्रीनिवास पंडित यांचा आज वाढदिवस.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
माणसाचे वय कुणासाठी थांबत नाही. माणूस कितीही वयाने मोठा झाला तरी विचाराने नेहमी तरुण असायला पाहिजे. धनाची श्रीमंती ही येते-जाते. पण मनाची श्रीमंती ही कायम टिकते. आयुष्यात किती जगलो यापेक्षा कसा जगलो हे खूप महत्त्वाचे आहे. सुसंस्कृतपणा हीच आपली खरी समाजात ओळख असते. सुसंस्कृतपणा, “सुयोग्य” विचार, सु-नियोजितपणा, सुंदर मन, सुंदर शब्दांची जाण, सुजाणता हे सर्व गुण आणि आईवडिलांकडून आलेला साहित्यिक वारसा लाभलेल्या आपल्या सुयोग सरांचा आज वाढदिवस आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या भावी सुंदर वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
सुयोग सरांची आणि माझी ओळख ही एक वर्षाची. मला अजून आठवते. गेल्या वर्षी ते साळशी गावात आले होते. साळशी येथील माझा वर्गमित्र प्रसाद लाड याने त्यांना माझे नाव सांगितले. आणि आमची ओळख साळशी येथे झाली. आपली सिंधूनगरी या न्युज चॅनेल साठी त्यांनी मला प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. त्यांच्या पहिल्याच भेटीत मला त्यांचा स्वभाव आवडला. त्यानंतर मालवण ला आपली सिंधूनगरी न्युज चॅनेल चा भव्यदिव्य शुभारंभ सोहळा पार पडला. त्या सोहळ्याचा प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचे मला भाग्य लाभले. आणि मी हळू हळू बातम्या पाठवायला सुरू केल्या.मी प्रिंट मीडियात २५ वर्षे काम केली आणि अजूनही करत आहे. पण मला इलेक्ट्रिक मीडियाचा अजिबात अनुभव नव्होता. मी नवखाच होतो. पण सरानी मला सर्व व्यवस्थित सांगितले. आज या गोष्टीला वर्ष झाले. सरानी माझ्यावर विश्वास ठेऊन “ब्युरोचीफ”म्हणून नियुक्ती केली. सरांकडून खूप काही शिकायला मिळाले. तसेच मला वैशाली पंडित मॅडम सारख्या गुरुमाऊली मिळाल्या.
पंडित मॅडम या माझ्या सख्या भावाच्या शिक्षिका. पण आज चॅनेल मुळे त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांचे ही मला वेळोवेळी खूप चांगले मार्गदर्शन मिळाले. चॅनेल चे संचालक विजय दादा रावराणे यांच्या रूपाने मला माझा मोठा भाऊ मिळाला. सौ. फिलोमिना मॅडम च्या रूपाने मला वहिनी मिळाली. कारण मी सुयोग सर जरी चॅनेल चे मुख्य संपादक असले तरी मी त्यांना माझा लहान भाऊ मानतो. सहिष्णू सारखा हुशार, बुद्धिमान आणि प्रेमळ मुलगा मिळाला. देवेंद्र सर, झुंझारराव ( झुंझार ची माझी अगोदरपासूनच ओळख आहे), विवेक परब, राकेश परब, नवलराज असे चांगल्या स्वभावाचे मित्र मिळाले. सौ. दिपाली पुजारे, प्रसन्ना पुजारे या चांगल्या गोड स्वभावाच्या मैत्रिणी, सहकारी मिळाल्या. सर आज तुमचा वाढदिवस आहे म्हणून यानिमित्त थोड जास्त बोललो. पण आपली संपूर्ण टीम च खूप चांगली आहे.
सुयोग सरांचे प्राथमिक शिक्षण खारेपाटण, टोपीवाला हायस्कूल आणि नंतर रेकोबा हायस्कूल ला झाले. मालवण येथील स. का. पाटील कॉलेज मधे इंग्लिश विषय घेऊन ते पदवीधर झाले. सरांचे इंग्रजी विषयावर कमालीचे प्रभुत्व आहे. साळशी ला असताना त्यांना शिकवायला अशोक रावजी कुंभार हे सर होते. मला सुध्दा तेच सर शिकवायला होते.
सरांकडे चांगली वैचारिक पातळी तर आहेच पण त्यांना विनोदाची पण उत्तम जाण आहे.सुहास शिरवळकर, पु.ल.देशपांडे, मच्छिंद्र कांबळी यांचे विनोद त्यांना खूप आवडतात. त्यांच्याकडे दूरदृष्टीपणा असून मानवी स्वभावाचा अचूक अंदाज त्यांच्याकडे आहे. बातम्यांची आकर्षक आणि मार्मिक शीर्षके यात कमालीचा हातखंडा आहे. चांगल्याला चांगले म्हणणार आणि खटकलेल्याना शब्दांनी ठोकून काढणार असा त्यांचा स्वभाव आहे. क्रिकेट आणि फुटबॉल ची आवड लहानपणापासूनच आहे. लहानपणी कुत्रा, मांजर यांच्यावर त्यांचे कमालीचे प्रेम होते.
कुठलेही काम करण्यात ते कधीच कमीपणा मानत नाहीत. “पंडित वडापाव” अशी वडापाव ची गाडी सुध्दा त्यांनी मन लाऊन चालवली. घरात विविध खाद्यपदार्थ बनविण्याची त्यांना खूप आवड. आई वडिलांवर त्यांचे निस्सीम प्रेम.आईवर त्यांची अतोनात भक्ती. आई वडिलांचा शिक्षकी पेशा. त्यांच्या अर्धांगिनी सौ. फिलोमिना या सुध्दा इंग्लिश स्कूल च्या टीचर आणि मुलगा सहिष्णू हा सद्या लॉ कॉलेज करतो. संपूर्ण पंडित घराणे उच्चशिशिक्षित आणि सुसंस्कृत आहे.अशा सुसंस्कृत घराण्यात सुयोग सरांचा २६ ऑगस्ट १९८० साली जन्म झाला. सर आज ४३ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना खूप चांगले उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो. त्यांचा संसार असाच खूप सुखाचा होवो.
आम्हाला त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळो. हीच त्यांना आपली सिंधूनगरी न्युज चॅनेल च्या संपूर्ण टीम कडून शुभेच्छा आणि सदिच्छा.🙏