27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवण नगरपरिषदेतर्फे होतेय धूळफेक ; माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांचा आरोप.

- Advertisement -
- Advertisement -

हर घर गुमराह” करुन खोगीर भरती करण्यापेक्षा कामाचे पूर्वनियोजन का झाले नसल्याचा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकरांचा परखड सवाल..

मालवण | सुयोग पंडित: दोनच दिवसांपूर्वी मालवण नगरपरिषदेतर्फे तथा प्रशासनातर्फे मालवणातील गणेशोत्सव सणापूर्वीच्या झालेल्या व्यवस्थांचे फोटो हे केवळ फोटोसेशन तथा केवळ इव्हेंट होता असा आरोप माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी केला आहे.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी मालवण नगरपरिषद प्रशासनावर प्रसिद्धीपत्राद्वारे आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

गेले सहा महिने मुख्याधिकारी तथा प्रशासक याना वारंवार सांगून आणि दीड महिन्यांपूर्वी शिवसेना माजी नगरसेवक यांच्या समवेत त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन येणाऱ्या गणेश चतुर्थी पूर्वी झाडी तोडणे, स्ट्रीट लाईट बाबत जादा कामगार घेणे, जादा लाईट खरेदी करून ठेवणे , सिमेंट पाणंद पावसाळ्यात निसरड्या होतात त्या साफ करणे , हायमास्ट बंद आहेत त्या दुरुस्त करून घेणे इत्यादी बाबत लेखी पत्र देऊनही गणेश चतुर्थीला चार दिवस शिल्लक असताना कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नसल्याचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी सांगितले आहे.

सध्या नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांकडून दुपारच्या सत्रात झाडी तोडण्याचे काम करून घेऊन त्याचे फोटो टाकून डोळ्यात धूळ फेकण्याचा काम सुरू आहे. गेल्यावर्षी पर्यंत सर्व झाडीची साफसफाई मशीन्स द्वारे करून घेतली जात होती.
पण या वर्षी अश्या प्रकारे काम केले जात नाही आहे. डास फवारणी बाबत जादा कर्मचारी घेऊन फवारणी करावी असे वारंवार सांगूनही फवारणी केलेली गेली नाही . आता नप च्या एका कर्मचारी मार्फत फवारणी करून काम सुरू केल्याचा आव आणला जात आहे. स्वच्छता विभागात आवश्यक कर्मचारी यांची भरती न करता ठेकेदारा मार्फत अनावश्यक स्टाफची खोगीर भरती केली गेली आहे , पण कामाचे कुठलेही नियोजन नाही. त्यामूळे अजूनही स्वच्छते बाबतच्या तक्रारी येत आहेत. फक्त फ़ोटो सेशन करून शासनाला रिपोर्ट पाठण्याइतपत काम केले जात असल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी केला आहे.

नगरपरिषदेने जो वॉट्सअप गृप स्थापन करून त्या वर नागरिकांनी तक्रार दाखल करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत त्यावरील पण या तक्रारींची दखल तीन तीन महिने घेतली जात नाही ही वस्तुतिथी आहे असेही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धीपत्रात विशेष नमूद केले आहे.

दरवर्षी मालवण शहरातील महत्वाच्या व्यक्ती, सामाजिक संस्था , व्यापारी , लोकप्रतिनिधी यांची गणेश चतुर्थी पूर्वी नियोजन बैठक घेण्यात येते पण ती यंदा घेण्यात आलेली नाही.
“हर घर तिरंगा” सारखे कार्यक्रम कुठल्याही लोक प्रतिनिधी ना विश्वासात न घेता राबवले गेले , त्यामुळे किती लोकांनी नप कार्यालयात येऊन झेंडे घेऊन गेले त्याची खरी आकडेवारी प्रशासकांनी जाहीर करावी असेही आवाहन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी केले आहे.

पावसाळी गटार व नाले सफाई बाबत असंख्य तक्रारी असल्याने या बाबत लेखी तक्रार करून बिल अदा करू नये असं कळवूनही बिल अदा केले गेले आणि तो कंत्राटदार अर्धवट काम टाकून पळून गेला. या अदा केलेल्या बिलाची माहिती मिळावी म्हणून महिन्या पूर्वी अर्ज करूनही अद्याप माहिती दिली गेलेली नाही . त्याच प्रमाणे याच ठेकेदाराने कचरा संकलन टेंडर घेतल्याने त्याच टेंडर रद्द करणे बाबत सूचना करूनही याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही.अग्निशमन बिल्डींग च्या कामा तक्रार देऊन निकृष्ट दर्जाचे झालेले काम सुधारून घेऊनच त्या नंतर ठेकेदाराला बिल अदा करणे बाबत सूचना करूनही त्याचे रनिंग बिल अदा केले गेले आहे.
अनेक चुकीच्या कामाबाबत ठेकेदार यांच्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करूनही अद्याप या बाबत ठोस कार्यवाही केल्याचे कोणाला माहीत नाही असाही एक संवेदनशील मुद्दा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी उपस्थित केला आहे.

नगरपरिषद मुख्य अधिकारी आणि प्रशासक या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच व्यक्ती कडे असल्याने कोणाचाही अंकुश नसल्याने अश्या प्रकारचे काम नप मध्ये सुरू आहे.
महोत्सवासारखे इव्हेंट ज्या पद्धतीने नियोजित केले गेले, जी तत्परता दाखविली तीच तत्परता नगरपरिषदेच्या दैनंदीन कामकाजात दिसून येत नाही असा थेट आरोप करताना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी त्यांचा कार्यकाळ जरी संपला असला तरी निवडणूक होऊन नवीन लोकप्रतिनिधी येई पर्यंत लोकांची काम करणे ही आमची नैतिकता आहे अस आम्ही मानतो असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या अश्या प्रकारच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी आमच्या
कडे प्राप्त आहेत याबाबत आमच्या आमदार , खासदार यांच्या कडे आवश्यक माहिती सह तक्रार दाखल करणार आहोत असा इशाराही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिला आहे.
” हर घर गुमराह” करण्यापेक्षा व इतर देखावे करण्यापेक्षा कामांचे पूर्वनियोजन होऊन सामान्य नागरीकांच्या मूलभूत व्यवस्थांकडे नगरपरिषदेचे लक्ष गेले तर ते जनहीताचे ठरेल असा सल्ला माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

"हर घर गुमराह" करुन खोगीर भरती करण्यापेक्षा कामाचे पूर्वनियोजन का झाले नसल्याचा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकरांचा परखड सवाल..

मालवण | सुयोग पंडित: दोनच दिवसांपूर्वी मालवण नगरपरिषदेतर्फे तथा प्रशासनातर्फे मालवणातील गणेशोत्सव सणापूर्वीच्या झालेल्या व्यवस्थांचे फोटो हे केवळ फोटोसेशन तथा केवळ इव्हेंट होता असा आरोप माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी केला आहे.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी मालवण नगरपरिषद प्रशासनावर प्रसिद्धीपत्राद्वारे आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

गेले सहा महिने मुख्याधिकारी तथा प्रशासक याना वारंवार सांगून आणि दीड महिन्यांपूर्वी शिवसेना माजी नगरसेवक यांच्या समवेत त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन येणाऱ्या गणेश चतुर्थी पूर्वी झाडी तोडणे, स्ट्रीट लाईट बाबत जादा कामगार घेणे, जादा लाईट खरेदी करून ठेवणे , सिमेंट पाणंद पावसाळ्यात निसरड्या होतात त्या साफ करणे , हायमास्ट बंद आहेत त्या दुरुस्त करून घेणे इत्यादी बाबत लेखी पत्र देऊनही गणेश चतुर्थीला चार दिवस शिल्लक असताना कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नसल्याचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी सांगितले आहे.

सध्या नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांकडून दुपारच्या सत्रात झाडी तोडण्याचे काम करून घेऊन त्याचे फोटो टाकून डोळ्यात धूळ फेकण्याचा काम सुरू आहे. गेल्यावर्षी पर्यंत सर्व झाडीची साफसफाई मशीन्स द्वारे करून घेतली जात होती.
पण या वर्षी अश्या प्रकारे काम केले जात नाही आहे. डास फवारणी बाबत जादा कर्मचारी घेऊन फवारणी करावी असे वारंवार सांगूनही फवारणी केलेली गेली नाही . आता नप च्या एका कर्मचारी मार्फत फवारणी करून काम सुरू केल्याचा आव आणला जात आहे. स्वच्छता विभागात आवश्यक कर्मचारी यांची भरती न करता ठेकेदारा मार्फत अनावश्यक स्टाफची खोगीर भरती केली गेली आहे , पण कामाचे कुठलेही नियोजन नाही. त्यामूळे अजूनही स्वच्छते बाबतच्या तक्रारी येत आहेत. फक्त फ़ोटो सेशन करून शासनाला रिपोर्ट पाठण्याइतपत काम केले जात असल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी केला आहे.

नगरपरिषदेने जो वॉट्सअप गृप स्थापन करून त्या वर नागरिकांनी तक्रार दाखल करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत त्यावरील पण या तक्रारींची दखल तीन तीन महिने घेतली जात नाही ही वस्तुतिथी आहे असेही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धीपत्रात विशेष नमूद केले आहे.

दरवर्षी मालवण शहरातील महत्वाच्या व्यक्ती, सामाजिक संस्था , व्यापारी , लोकप्रतिनिधी यांची गणेश चतुर्थी पूर्वी नियोजन बैठक घेण्यात येते पण ती यंदा घेण्यात आलेली नाही.
"हर घर तिरंगा" सारखे कार्यक्रम कुठल्याही लोक प्रतिनिधी ना विश्वासात न घेता राबवले गेले , त्यामुळे किती लोकांनी नप कार्यालयात येऊन झेंडे घेऊन गेले त्याची खरी आकडेवारी प्रशासकांनी जाहीर करावी असेही आवाहन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी केले आहे.

पावसाळी गटार व नाले सफाई बाबत असंख्य तक्रारी असल्याने या बाबत लेखी तक्रार करून बिल अदा करू नये असं कळवूनही बिल अदा केले गेले आणि तो कंत्राटदार अर्धवट काम टाकून पळून गेला. या अदा केलेल्या बिलाची माहिती मिळावी म्हणून महिन्या पूर्वी अर्ज करूनही अद्याप माहिती दिली गेलेली नाही . त्याच प्रमाणे याच ठेकेदाराने कचरा संकलन टेंडर घेतल्याने त्याच टेंडर रद्द करणे बाबत सूचना करूनही याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही.अग्निशमन बिल्डींग च्या कामा तक्रार देऊन निकृष्ट दर्जाचे झालेले काम सुधारून घेऊनच त्या नंतर ठेकेदाराला बिल अदा करणे बाबत सूचना करूनही त्याचे रनिंग बिल अदा केले गेले आहे.
अनेक चुकीच्या कामाबाबत ठेकेदार यांच्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करूनही अद्याप या बाबत ठोस कार्यवाही केल्याचे कोणाला माहीत नाही असाही एक संवेदनशील मुद्दा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी उपस्थित केला आहे.

नगरपरिषद मुख्य अधिकारी आणि प्रशासक या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच व्यक्ती कडे असल्याने कोणाचाही अंकुश नसल्याने अश्या प्रकारचे काम नप मध्ये सुरू आहे.
महोत्सवासारखे इव्हेंट ज्या पद्धतीने नियोजित केले गेले, जी तत्परता दाखविली तीच तत्परता नगरपरिषदेच्या दैनंदीन कामकाजात दिसून येत नाही असा थेट आरोप करताना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी त्यांचा कार्यकाळ जरी संपला असला तरी निवडणूक होऊन नवीन लोकप्रतिनिधी येई पर्यंत लोकांची काम करणे ही आमची नैतिकता आहे अस आम्ही मानतो असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या अश्या प्रकारच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी आमच्या
कडे प्राप्त आहेत याबाबत आमच्या आमदार , खासदार यांच्या कडे आवश्यक माहिती सह तक्रार दाखल करणार आहोत असा इशाराही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिला आहे.
" हर घर गुमराह" करण्यापेक्षा व इतर देखावे करण्यापेक्षा कामांचे पूर्वनियोजन होऊन सामान्य नागरीकांच्या मूलभूत व्यवस्थांकडे नगरपरिषदेचे लक्ष गेले तर ते जनहीताचे ठरेल असा सल्ला माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिला आहे.

error: Content is protected !!