30.1 C
Mālvan
Thursday, December 12, 2024
IMG-20240531-WA0007

आचरा ते कुडाळ एसटी बस फेरी झाली पूर्ववत…!

- Advertisement -
- Advertisement -

कांदळगाव सरपंच सौ .उमदी परब यांनी वेधले होते लक्ष…!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
आचरा ते कांदळगाव मार्गे कुडाळ ही सकाळी ६.३० वाजता सुटणारी बंद असलेली एसटी बसफेरी बुधवार पासून पूर्ववत झाल्याने विध्यार्थी वर्ग तसेच प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. सदर बसफेरी पूर्ववत करावी अशी मागणी
कांदळगाव सरपंच सौ उमदी उदय परब यांनी मालवण एसटी आगार व कणकवली विभाग नियंत्रक यांच्या जवळ लेखी निवेदनाद्वारे केली होती.
कोरोना कालावधीपूर्वी कुडाळ आचरा ही कुडाळ डेपोची सकाळी ६.३० वाजता आचऱ्यावरुन सुटणारी एस टी सकाळी ७ वाजता च्या दरम्याने कांदळगाव राणेवाडी, रतांबी स्टॉप मार्गे रामेश्वर मंदीर या ठिकाणाहून मालवण कुडाळला जात होती. सदर गाडी मध्ये कांदळगाव मधील बहुतांश शाळा, कॉलेजचे विदयार्थी जात होते परंतु कोरोना कालावधी नंतर सदरची गाडी बंद असल्यामुळे कांदळगावातील विध्यार्थ्यांना जाणे गैरसोयीचे होत होते. परीणामी शालेय विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. सदरची गाडी पूर्वी प्रमाणे नियमित सुरु केल्याने विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. सदर बसफेरी पूर्ववत चालू केल्याने एसटी विभाग नियंत्रक व मालवण आगार व्यवस्थापक यांचे सरपंच सौ उमदी परब यांनी आभार मानले आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कांदळगाव सरपंच सौ .उमदी परब यांनी वेधले होते लक्ष…!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
आचरा ते कांदळगाव मार्गे कुडाळ ही सकाळी ६.३० वाजता सुटणारी बंद असलेली एसटी बसफेरी बुधवार पासून पूर्ववत झाल्याने विध्यार्थी वर्ग तसेच प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. सदर बसफेरी पूर्ववत करावी अशी मागणी
कांदळगाव सरपंच सौ उमदी उदय परब यांनी मालवण एसटी आगार व कणकवली विभाग नियंत्रक यांच्या जवळ लेखी निवेदनाद्वारे केली होती.
कोरोना कालावधीपूर्वी कुडाळ आचरा ही कुडाळ डेपोची सकाळी ६.३० वाजता आचऱ्यावरुन सुटणारी एस टी सकाळी ७ वाजता च्या दरम्याने कांदळगाव राणेवाडी, रतांबी स्टॉप मार्गे रामेश्वर मंदीर या ठिकाणाहून मालवण कुडाळला जात होती. सदर गाडी मध्ये कांदळगाव मधील बहुतांश शाळा, कॉलेजचे विदयार्थी जात होते परंतु कोरोना कालावधी नंतर सदरची गाडी बंद असल्यामुळे कांदळगावातील विध्यार्थ्यांना जाणे गैरसोयीचे होत होते. परीणामी शालेय विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. सदरची गाडी पूर्वी प्रमाणे नियमित सुरु केल्याने विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. सदर बसफेरी पूर्ववत चालू केल्याने एसटी विभाग नियंत्रक व मालवण आगार व्यवस्थापक यांचे सरपंच सौ उमदी परब यांनी आभार मानले आहेत.

error: Content is protected !!