28.2 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

घुमडाई मंदिर येथे आयोजित भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत आणि माजी खासदार निलेश राणे यांची दिलखुलास भाषणे..

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघातुन आपण आमदार व्हावे या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. मात्र आपण कोणत्या पदावर जावे ही देवाची इच्छा. लोकांसाठी, समाजासाठी काम करत राहायचे. याच भावनेतून काम करत असताना पक्षाचे आदेश व देवाच्या इच्छेने आमदार झालो तर माझ्या नंतर दत्ता सामंत यांनाही त्याच सन्मानाने विधिमंडळात नेणे हे आपले सर्वतोपरी प्रयत्न राहतील असा विश्वास भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण घुमडे येथे बोलताना व्यक्त केला.

दत्ता सामंत यांच्या वतीने घुमडाई मंदिर येथे आयोजित भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी निलेश राणे व दत्ता सामंत यांची दिलखुलास भाषणे झाली. मार्मीक राजकीय राजकीय टोलेबाजीही झाली.
यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी दत्ता सामंत यांच्या भजन स्पर्धा आयोजनाचे कौतुक केले. सामंत यांचे कार्य व कार्यक्रम कधीच फायद्यासाठी नसतात तर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी असतात. तसेच त्यांचे कार्यक्रम आयोजन वेगळ्या उंचीचे व दर्जेदार असतात. ही भजन स्पर्धाही यशस्वी झाली.

निलेश राणे पुढे म्हणाले, याठिकाणी दत्ता सामंत यांच्यासह सगळेच माझ्या आमदार साठी सदिच्छा व्यक्त करतात. मात्र मी कोणत्या पदावर जावे ही देवाची इच्छा पक्षाचे आदेश असतील. मात्र दत्ता सामंत सारखी माणसे मनाने मोठी आहेत. दुसऱ्याला मोठे करणे, मोठे व्हा हे त्यांचे सांगणे यालाही मनाचा मोठेपणा लागतो. त्यांनी माणसे कमावली. राणे साहेबांसोबत ते निष्ठेने राहिले. राजकारणसाठी त्यांनी काही केले नाही. केवळ समाजकारण केले. जनतेची सेवा हीच राणे साहेबांची शिकवण आहे. त्याच धर्तीवर आम्हीही कार्य करतो. दत्ता सामंत आणि आमच्यात आपुलकीचे नाते आहे. आम्ही सांघिक खेळ खेळतो. मैदानात खेळ खेळायला आम्हाला आवडते. म्हणजेच सर्वांसोबत राहायला आम्हाला आवडते. जनता हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे.

दत्ता सामंत यांच्या बाबत सांगायचे तर उद्योजक होणे आणि आमदारकीच्या स्पर्धेत येणे हे दत्ता सामंत यांचे मोठे यश आहे. मोठे कर्तृत्व आहे. त्यांचे जमाखर्चाचे ताळेबंद हे सामाजिक कार्यातच अधिक खर्च दाखवत असणार हे निश्चित.

सर्वांच्या आशिर्वादाने आपण आमदार झालो तर विधिमंडळ सभागृहात दत्ता सामंतही असतील हे नक्कीच असे डाॅ.निलेश राणे यांनी स्पष्ट केले. दत्ता सामंत माझे मोठे भाऊ आहेत आणि हे नाते कायम राहील. मी पक्षाकडे त्यांच्यासाठी शिफारस करणार. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी राणे कुटुंबियां पासून सामंत वेगळे होणारच नाहीत व त्यांच्यात मतभेदअसणार नाही असे प्रतिपादन डाॅ. निलेश राणे यांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!