स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि श्रावण महिन्याचे औचित्य साधून स्पर्धेचे केलेले आयोजन..
विवेक परब |एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आचरा येथील सुप्रसिद्ध यशराज प्रेरणा गृप या सामाजिक समूहातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि श्रावण याचे औचित्य साधून आयोजित कुकींग क्वीन स्पर्धेत सौ .जयश्री साने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक अमृता कोळेकर तर तृतीय क्रमांक वैष्णवी चिरमुले यांनी मिळवला.
उत्तेजणार्थ म्हणून रागिणी ढेकणे, मृणालिनी आचरेकर यांना गौरविण्यात आले. स्पर्धेचे बक्षिस वितरण आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत सांबारी, निलेश सरजोशी, उर्मिला सांबारी आदींच्या हस्ते केले गेले. यावेळी यशराज संघटनेचे अध्यक्ष मंदार सरजोशी, बाबाजी भिसळे, सुभाष सांबारी, सुगंधी गुरव, मारुती आचरेकर, अभिजीत जोशी, उज्वला सरजोशी, आशा हजारे, परीक्षक निशिगंधा भिरवंडेकर, रुचिता आचरेकर, यशराज संघटनेचे उर्मिला आचरेकर, मिनल कोदे, पूनम कोदे, धनश्री आचरेकर, रोहित भिरवंडेकर अथर्व आचरेकर , जितू नायर, मानसी सरजोशी , प्रथमेश कांबळी, रवी मुंबरकर , मिताली कोरगावकर , पंकज घारे , राजू चिरमुले , प्रियांका हिंदळेकर प्रणाली पुजारे यांसह अन्य सदस्य आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली .